फक्त 10 रूपयात शरीर सदृढ अन् निरोगी, ‘या’ 7 गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या

फक्त 10 रूपयात शरीर सदृढ अन् निरोगी, ‘या’ 7 गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – फिटनेससाठी अनेक लोक जिममध्ये जातात, महागडा डाएट घेतात. तर अनेकजण शरीर पिळदार बनविण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. परंतु, हे सर्वांनाच शक्य होत नाही. अशाप्रकारे लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा कमी पैशात तुम्ही शरीर सदृढ आणि निरोगी करू शकता. रोज भाजलेले चणे आणि गुळ खाल्ल्यास शरीराला खूप फायदा होतो. बॉडी बनविण्यासाठी आणि मसल्स बनविण्यासाठी व्यायामासह चणे आणि गुळ सेवन करावे.

हे आहेत फायदे

१) चणे आणि गुळामध्ये भरपूर प्रोटीन असतात, जे मसल्स मजबूत बनण्यास फायदेशीर ठरतात.

२) यात झिंक असल्याने त्वचेची चकाकी वाढते. चेहऱ्यावरची चमक वाढते.

३) गुळ आणि चने एकत्र सेवन केल्याने शरीराचा मेटॅबॉलिज्म वाढतो.

४) लठ्ठपणा कमी होतो.

५) वजन कमी करण्यासाठी व्यायामासह गुळ आणि चण्याचे सेवन करावे.

६) यातील फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत होते.

७) मेंदूला विटॅमिन बी भरपूर प्रमाणात मिळाल्याने मेंदू अ‍ॅक्टिव्ह होतो. स्मरणशक्ती वाढते. मेंदूच्या नसांना मजबूती मिळते.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु