गरोदरपणानंतर वजन घटविण्यासाठी ‘हा’ मजेशीर उपाय, जाणून घ्या 6 फायदे

गरोदरपणानंतर वजन घटविण्यासाठी ‘हा’ मजेशीर उपाय, जाणून घ्या 6 फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – झुंबा हा एक प्रकारचा कार्डिया आणि मजेशीर वर्कआऊट प्रकार आहे. यात विशिष्ट प्रकारच्या संगीतामध्ये ४०-४५ मिनिटे सतत मुव्हमेंट केल्याने कॅलरीज बर्न होतात. रटाळ व्यायामप्रकारांऐवजी हा प्रकार करताना आनंद मिळतो. झुंबाला वयाचे बंधन नसून शारिरीक अवस्थेनुसार झुंमा प्रशिक्षक गरोदर स्त्रियांना सुद्धा योग्य प्रकार सुचवतात. त्यामुळे गरोदरपणात आणि त्यानंतरही वजन आटोक्यात ठेवण्यासाठी झुंबा फायदेशीर आहे. झुंबाचे अन्य कोणते फायदे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत.

हे आहेत ६ फायदे

1) डिप्रेशन सारख्या गुंतागुंतीच्या समस्यांदेखील दूर होतात.
2) शरीरातील कॅलरीज कमी होतात.
3) बारीक असलेल्यांसाठी झुंबा टोनिंगमुळे शरीर टोन मध्ये ठेवण्यास मदत होते.
4) झुंबासाठी वयाचे बंधन नाही. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व करू शकतात.
5) शारीरिक क्षमतेनुसार तीव्रता आणि प्रकार तुम्ही निवडू शकता.
6) हार्ट रेटही सुधारतो.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु