तरूणींनो, मानुषी छिल्लरच्या ‘फिगर’ चे हे आहे रहस्य ! ‘या’ 10 गोष्टी करा फॉलो

तरूणींनो, मानुषी छिल्लरच्या ‘फिगर’ चे हे आहे रहस्य ! ‘या’ 10 गोष्टी करा फॉलो

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मिस वल्र्ड मानुषी छिल्लरच्या सौंदर्यावर आणि फिगरवर तिचे चाहते प्रचंड फिदा आहेत. म्हणूनच आपण मानुषीच्या फिट, सुंदर दिसण्याचे आणि उत्तम फिगरचे रहस्य आपण जाणून घेणार आहोत. तिच्यासारखी फिगर हवी असल्यास तिचा आहार आणि व्यायाम तुम्ही सुद्धा फॉलो करू शकता.

हे आहे रहस्य

1) तेलकट खाऊ नका. उकडलेले, ग्रिल्ड केलेले पदार्थ खा.

2) थंडपेयाऐवजी ज्यूस प्या.

3) रोज संध्याकाळी ७.३० वाजताच जेवण करा.

4) दिवसभरात किमान ३ लिटर पाणी प्या.

5) कमीत कमी ८ तास झोप घ्या. झोपण्यापूर्वी २ तास आधी सगळे स्क्रिन बंद करा. चाला, गप्पा मारा, पुस्तक वाचा.

6) दिवसाला किमान ३० मिनिटे व्यायाम करा.

7) नाश्ता चुकवू नका, तो चुकवणे म्हणजे भूक वाढवणे.

8) लहान डिशमध्ये थोडे थोडे खा. यामुळे भूक चाळवत नाही. चमचमीत, गोड खाण्याची इच्छा कमी होते.

9) मधल्या वेळेत मात्र जंक फूड खाऊ नका. फळे, सुकामेवा, पॉपकॉन, चिकी खा.

10) साखर अजिबात खाऊ नका. त्याऐवजी गूळ, खजूर, मध खा.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु