रोज सकाळी केवळ ३० मिनिटे चाला, होतील ‘हे’ आश्‍चर्यचकित करणारे १५ फायदे

रोज सकाळी केवळ ३० मिनिटे चाला, होतील ‘हे’ आश्‍चर्यचकित करणारे १५ फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सकाळी केवळ तीस मिनिटे चालल्‍याने आरोग्याचे आश्चर्यकारक असे अनेक फायदे होऊ शकतात. शरीराला आवश्यक तो व्यायाम न मिळाल्यास अपचन, मधुमेह आणि हृदयरोग असे आजार होतात. हे आजार टाळण्यासाठी रोज केवळ तीस मिनिटे चालले पाहिजे. यामुळे हे सर्व आजार नाहिसे होऊ शकतात. कारण तीस मिनिटांचा मॉर्निंग वॉक हा दोन तासांच्‍या जिमच्‍या बरोबर असतो.

ताण कमी होतो
सकाळी फिरल्‍याने ताण कमी होण्‍यास मदत होते. कारण यावेळी तुमच्‍या शरीरातील वेदना शमविणारे काही घटक रक्‍तात योग्‍य प्रमाणात प्रवाहित होत असतात. यामुळे तुमचा ताण नैसर्गिकरित्‍या कमी होण्‍यास मदत होते.

कँसर
हेक्टिक आणि अनियमित जीवनशैलीचा फटका कँसरच्‍या रुपातही बसण्‍याची शक्‍यता आहे. रोज सकाळी फिरल्‍याने हा धोकाही टाळता येऊ शकतो.

मेंदूची कार्यक्षमता
सकाळी फिरल्‍याने मेंदूला पुरेशा प्रमाणात रक्‍त आणि ऑक्सिजन मिळते. यामुळे तुमची स्‍मरणशक्‍ती आणि विचार करण्‍याची शक्‍ती वाढते.

गर्भपात
गर्भवती महिलांसाठी चालणे लाभदायक आहे. यावेळी हार्मोनमधील बदलांमुळे त्रास होण्‍याची शक्‍यता असते. मात्र चालण्‍याने हार्मोन नियंत्रणात राहतात.

थकवा
सकाळी फिरण्‍याचा फायदा म्‍हणजे शरीराची उर्जा वाढते. यामुळे आपल्‍याला दिवसभर ताजेतवाने वाटते. यामुळे आपली कार्यक्षमता वाढते.

डायबिटीज
सकाळी रोज अर्धा तास फिरल्‍याने ब्‍लड शुकर नियंत्रणामध्‍ये राहते. शरीर अधिक प्रमाणात ग्‍लुकोज वापरते. यामुळे अतिरीक्‍त चरबी कमी होते. इन्‍सूलिनचे प्रमाणही नियत्रंणात राहते. डायबिटीजची शक्‍यता फार कमी होते.

लठ्ठपणा
लठ्ठपणा हा बहुतांश आजाराचे मुख्‍य कारण आहे. यासासाठी सकाळी फिरणे हा सर्वात चांगला उपाय आहे. ह्रदयासाठीही हे चांगले आहे. याने थकवा दूर होऊन फ्रेश वाटते. शरीराची लवचिकता व स्‍नायूंची शक्‍तीही वाढते.

सुडौल शरीर
शरीर सुडौल दिसण्यासाठी वॉकिंग करा. यामुळे तुमचे स्‍नायू, पाय, पोट, हिप हे उत्‍कृष्‍टरित्‍या टोन होतात.

हार्ट अटॅक
आठवड्यातून किमान ५ दिवस रोज ३० मिनिट मॉर्निंग वॉक केल्यास हार्ट अटॅकचा धोका ४० टक्‍क्‍याने कमी होतो.

शांत झोप
दिवसभरच्‍या ताणतणावामुळे अनिद्रेचाही त्रास होऊ शकतो. अशावेळी गोळ्या खाऊन झोपण्‍याएवजी सकाळी फिरायला जाणे.

संधिवात
संधीवाताचाही धोका टाळण्‍यासाठी आठवड्यातून किमान ५ दिवसतरी सकाळी फिरायला जावे. महिलांना याचा खूप फायदा होऊ शकेल.

रक्‍तवाहिन्‍या
सकाळी फिरल्‍याने रक्‍ताभिसरण वेगाने होते व धमन्‍यांमध्‍ये काहीही साचून राहत नाही. यामुळे पूर्ण शरीराला मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळतो.

ह्रदय
ह्रदयाचे काही आजार असतील तर सकाळी चालण्‍यास सुरुवात करावी. यामुळे ह्रदय, फुप्‍फुसांची कार्यक्षमता वाढते.

प्रतिकारक्षमता
रोज सकाळी चालण्‍याने रक्‍ताभिसारण चांगले होते. शरीराला याचे खूप फायदे होतात. यामुळे शरीराची प्रतिकारक्षमता वाढते.

कोलेस्ट्रॉल
कोलेस्ट्रॉल अधिक प्रमाणात झाले तर यामुळे ह्दयाचे आजार होऊ शकतात. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्‍याचा सर्वात सोपा उपाय म्‍हणजे सकाळी ३० मिनिटे चालणे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु