कमी केलेले वजन नियत्रंणात ठेवणेही अवघड, फॉलो करा ‘या’ टीप्‍स

कमी केलेले वजन नियत्रंणात ठेवणेही अवघड, फॉलो करा ‘या’ टीप्‍स

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वाढलेले वजन कमी करण्यासाठी जिमला जाणे, योग्य डाएट घेणे असे उपाय केले जातात. वजन कमी करणे तसे अवघड असते. यासाठी खुप मेहनत घ्यावी लागते. परंतु, कमी केलेले वजन नियंत्रणात ठेवणेसुद्धा तेवढेच कठीण असते. वजन कमी केल्यानंतर आपल्याकडून काही चुका आपोआप होतात, आणि त्यामुळे वजन पुन्हा वाढू शकते. यासाठी कोणती काळजी घ्यावी, याविषयी माहिती घेवूयात.

ग्रीन टी प्या
ग्रीन टी दिवसातून दोन किंवा तीन वेळा प्या. यामुळे वजन नियंत्रित राहते.

घरून खाऊन जा
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी घरातून जेवण करून जावे. यामुळे बाहेरचे खाणे टाळता येते.

पूर्ण झोप घ्या
कमीत कमी सात तासांची झोप घ्या. यामुळे भूक वाढवणारे हार्मोन्स वाढत नाही आणि वजन नियंत्रित राहते.

चव घेऊन खा
लवकर खाल्ल्याने अन्न योग्य चावले जात नाही. तसेच जास्त अन्न पोटात जाते. यासाठी हळूहळू चावून आणि चव घेऊन खा. यामुळे दीर्घकाळ भूक लागत नाही. वजन नियंत्रणात राहते.

व्यायाम
नियमित ३० मिनिटे मॉर्निंग वॉक करा. यामुळे अतिरिक्त कॅलरी बर्न होतील.

तणाव कमी करा
सतत तणावामध्ये राहिल्याने शरीरामध्ये भूक वाढवणारे हार्मोन्सची पातळी वाढते. यासाठी योगा आणि ध्यानधारणा करा.

नाष्टा भरपूर करा
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळचा नाष्टा भरपूर करा. यामुळे दिवसभर कमी भूक लागते.

पालेभाज्या
पत्ताकोबी, पालक आणि मेथीमध्ये भरपूर फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. या भाज्या नियमित खा.

डेयरी प्रॉडक्ट्स
दूध, दही, ताक आणि पनीरसारखे पदार्थ नियमित खा. यातील प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि न्यूट्रीएंट्समुळे पचनशक्ती वाढते. यामुळे वजन नियंत्रित राहते.

प्रोटीन
प्रोटीन मसल्स बनवण्यात मदत करतात. आहारात योग्य प्रोटीन असल्यास वजन नियंत्रणात राहते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु