वजन आटोक्यात ठेवण्यासाठी ‘या’ पद्धतीने मेटॅबॉलिझम रेट वाढवा

वजन आटोक्यात ठेवण्यासाठी ‘या’ पद्धतीने मेटॅबॉलिझम रेट वाढवा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शरीराचे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी तुमचा मेटॅबॉलिझम रेट महत्त्वाची भूमिका पार पाडतो. अन्‍नावाटे शरीरात घेतल्या जाणार्‍या उष्मांकापासून शरीराच्या प्रत्येक कार्यासाठी लागणारी ऊर्जा तयार करणे म्हणजे मेटॅबॉलिझम. मेटॅबॉलिझम वाढल्यानं शरीरातील चरबी कमी होते. मेटॅबॉलिझम वाढवण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी खालील उपाय करा –

मेटॅबॉलिझम वाढवण्यासाठी उपाय –

1) मेटॅबॉलिझम सुधारण्यासाठी डाएट जशी प्रमुख भूमिका पार पाडते तसेच तुमचा व्यायामदेखील गरजेचा असतो. प्रत्येक व्यक्‍तीने कमीत कमी 30 मिनिटे व्यायाम रोज केलाच पाहिजे. व्यायाम केल्याने शरीरातील रक्‍ताभिसरण वेगाने होते.  त्यामुळे चयापचयाची क्षमताही वेगाने होते.

 2) शरीराचे मेटॅबॉलिझम सुधारण्यासाठी चालणं आवश्यक आहे.

3) शरीरातील रासायनिक प्रक्रियांसाठी शरीरातील हार्मोन्स आणि पाणी यांची गरज असते. पाण्यामुळे शरीराची चयापचय क्षमता वाढते. तहानेपेक्षा थोडे जास्त पाणी प्यायला हवे.  एका तंदुरुस्त व्यक्‍तीला दिवसातून 2.5 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

 4) आहार सेवन करताना तो भुकेपेक्षा थोडा कमी सेवन केला पाहिजे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु