थंड वातावरणात काही दिवस ‘या’ १४ पदार्थांपैकी काही एक खाल्ल्यास शरीराला मिळेल बळ

थंड वातावरणात काही दिवस ‘या’ १४ पदार्थांपैकी काही एक खाल्ल्यास शरीराला मिळेल बळ

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आहाराचे योग्य नियोजन केल्यास शरीर संतुलित राहण्यास मदत होते. काही पदार्थ असे आहेत, जे शरीरात ऋतूनुसार बदलण्याची क्षमता निर्माण करतात. शरीरामध्ये जर स्वतःला ऋतूप्रमाणे बदलण्याची क्षमता असेल तर थंडी कमी जाणवते. विविध आजारांपासून दुर राहणे सुद्धा शक्य होते. हे पदार्थ कोणते आहेत, याविषयी माहिती घेवूयात.

बाजरी
थंडीच्या दिवसांमध्ये बाजरीची भाकरी अवश्य खावी. यामध्ये आरोग्यवर्धक गुण असतात ग्रामीण भागात बाजरीची भाकरी आणि दुध, गुळाचे हिवाळ्यात आवडीने सेवन केले जाते. बाजरीमध्ये मॅग्नेशियम,कॅल्शियम,मॅग्नीज, फायबर, व्हिटॅमिन- बी, अँटीआक्सीडेंटचे प्रमाण भरपूर असते.केशर

हिवाळ्यात केशराचा उपयोग लाभदायक मानला जातो. थंडीमध्ये याचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच पौरुष आणि सौंदर्यामध्ये वृद्धी होते.

Image result for केसर

अद्रक

आल्यामुळे शरीराला गरमी मिळते आणि डायजेशनही चांगले राहते. अद्रक तिखट रसाचे, पाचक, मलसारक आहे. पोटदुखीची समस्या त्वरित दूर होते. अद्रकाच्या सेवनाने गॅस, अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण करणारे विषाणू नष्ट होतात.

Related image

मध

मध सर्वच ऋतुंमध्ये आरोग्यदायी मानले जाते. आहारामध्ये मधाचा अवश्य समावेश करावा. यामुळे पचनक्रियेत सुधार होईल तसेच रोगप्रतिकारकशक्तीसुद्धा वाढेल.

Image result for मध

दूध

दुधाच्या सायीत बारीक खडीसाखर मिसळून खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते. एक बदाम दुधात उगाळून दुधात मिसळून घेतल्यास शरीराला बळ मिळते. पांढरी मुसळी किंवा धोली मुसळीची एक चमचा पावडर, एक चमचा बारीक खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ-संध्याकाळ कोमट दुधातून घ्या. हे खूप शक्तिवर्धक आहे.

Image result for दूध

तिळ

तिळ शरीराला उष्णता देतात. तिळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगले असून, त्यातील झिंक हाडांचा ठिसूळपणा रोखतात. संधीवातासारख्या विकारांवर उपयुक्त ठरते. कोलेस्टेरॉल कमी करू करून कॅन्सरपासून संरक्षण होते. याच्या तेलातील सीसमोल आणि सिसमीन हे काही विशेष घटक उत्तम अ‍ॅन्टी ऑक्सिडंट्स आहेत.

Image result for तिळ
उडदाची डाळ
उडदाचे लाडू तयार करून याचे सेवन केल्यास सेक्स शक्ती वाढते आणि शरीर ताकदवान होते. यामध्ये व्हिटॅमिन, खनिज, लवण, कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह तत्व, मॅग्नेशिअम तत्व भरपूर प्रमाणात असतात.

Image result for उडदाची डाळ
खारीक
पचनशक्ती चांगली असेल तर खारीक जास्त प्रमाणात खाणे फायदेशीर ठरते. खारकेचे सेवन वर्षभर केले जाऊ शकते.

थंड वातावरणात काही दिवस ‘या’ १४ पदार्थांपैकी काही एक खाल्ल्यास शरीराला मिळेल बळ

पेंडखजूर

पेंडखजूरमध्ये प्रोटीन, वसा आणि शर्करा पर्याप्त प्रमाणात तसेच कॅल्शियम, लोहसुद्धा आढळून येते. पेंडखजूर दुधात उकळून घेतल्यास शरीर मजबूत आणि निरोगी राहते.

Related image
बदाम
महिलांनी याचे सेवन करणे फायद्याचे असते. बदामाच्या सालामध्ये फ्लेवोनॉइड्स नावाचे एंटीऑक्सीडेंट असते त्यामुळे बदाम खातांना साला सकट खावा. यामुळे हृदय आणि रक्त धामन्या सुरक्षित ठेवण्यास मदत होते.

थंड वातावरणात काही दिवस ‘या’ १४ पदार्थांपैकी काही एक खाल्ल्यास शरीराला मिळेल बळ

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु