एचआयआयपीए : वजन कमी करण्यासाठी विशेष वर्कआउट

एचआयआयपीए : वजन कमी करण्यासाठी विशेष वर्कआउट

आरोग्यनामा ऑनलाईन – आरोग्याविषयी अलिकडे बहुतांश लोक खूपच सावध झाले आहेत. यासाठी दररोज व्यायाम करणे, पोषक आहार घेणे, डाएट घेणे अशी काळजी घेतली जाते. आता हिप्पा एक्सरसाइज म्हणजेच एचआयआयपीए (हाय इन्टेसिटी इंटरवल टेनिंग) हा फिटनेसचा नवा प्रकार अधिक पसंत केला जात आहे. ६ सेकंद ते ४ मिनिटांपर्यंत ही एक्सरसाइज वेगाने केली जाते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ही एक्सरसाइज उपयोगी आहे.

हिप्पा एक्सरसाइज हाय इन्टेसिटी असून तरुणांचा या एक्सरसाइजकडे कल वाढत आहे. या एक्सरसाइजसाठी कमी वेळ लागतो. तसेच कॅलरी सुद्धा जास्त बर्न होतात. ही एक्सरसाइज १ किंवा २ मिनिटांसाठी वेगाने करावी लागते आणि नंतर आराम करावा लागतो. नंतर पुन्हा एकदा वेगाने एक्सरसाइज केली जाते. याचा कालावधी ६ सेकंद ते ४ मिनिटे असतो. यामधील ३० सेकंद ते ४ मिनिटांचा कालावधी हा आरामासाठी असतो. या एक्सरसाइजने शरीराची क्षमताही वाढते. ही एक्सरसाइज फार वेगाने केली जात असल्याने कमी वेळ देऊनही शरीराला अनेक फायदे होतात. ही एक्सरसाइज रोज केल्यास कार्डिओ आणि स्टेंथ टेनिंग दोन्हींचे फायदे होतात.

यास अ‍ॅथलीट वर्कआउट सुद्धा म्हटले जाते. वजन कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज चांगली, असल्याचे तज्ज्ञ सांगतात. यासाठी रोज केवळ ३० मिनिटे वेळ काढावा लागतो. आणि यामुळे विविध समस्या सहज दूर होतात. यात विविध प्रकार असून ज्यात शरीराच्या क्षमतेनुसार एक्सरसाइज दिली जाते. ही एक्सरसाइज करण्यासाठी विशेष अशी तयारी करावी लागत नाही. जर तुम्ही पायऱ्या चढून जात असाल तर वेगाने चढाव्यात किंवा चालत असाल तर वेगाने चालावे. ज्यांना स्वत:ला फिट ठेवायचे असेल लिफ्टची वाट पाहत बसण्याऐवजी पायऱ्यांचा वापर करा. वेगाने पायऱ्या चढाव्यात आणि थांबावे. पुन्हा वेगाने पायऱ्या चढाव्यात. याचे भरपूर लाभ असू बैठे काम करणाऱ्यांना याचा अधिक फायदा होतो. तसेच यासाठी फार मेहनतही घ्यावी लागत नाही. फक्त ही एक्सरसाइज करण्यापूर्वी शरीर यासाठी तयार करा. थोडा वार्मअप करणे गरजेचे आहे. परंतु, ही एक्सरसाइज तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच करावी.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु