वजन कमी करण्यासाठी महत्त्वाच्या ‘या’ १३ खास टीप्स

वजन कमी करण्यासाठी महत्त्वाच्या ‘या’ १३ खास टीप्स

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – वजन कमी करण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करणे खूप आवश्यक आहे. मात्र, विविध कारणे पुढे करून अनेकजण व्यायाम करण्यास नेहमी टाळाटाळ करतात. मात्र, कोणतेही कठीण व्यायाम न करता अगदी सोप्या पद्धतीने वजन कमी करता येऊ शकते. यासाठी काही टीप्स तुम्ही फॉलो करणे गरजेचे आहे.

जेवणाच्या आधी पाणी प्यावे
दिवसभरात पाण्यासोबतच लिंबू पाणी प्यावे. यामुळे एनर्जी लेव्हल स्थिर राहते. जेवणाआधी १ ते २ ग्लास पाणी पिल्याने पोट लवकर भरते आणि खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते.

पुरेशी झोप घ्या
जेवढे जास्त झोपता येईल तेवढे झोपण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमच्या शरिरातील कॅलरी बर्न होण्यास मदत होईल.

नियमित ग्रीन टी प्या
सकाळी अथवा दिवसभरात ग्रीन टी प्यावी. यामध्ये अँटीऑक्सीडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे तुमच्या शरिरातील कॅलरी कमी होण्यास मदत होते.

ओमेगा ३ युक्त आहार घ्या
ओमेगा ३ फॅट सॅल्मन फिशमध्ये जास्त असते. ओमेगा शरीरात नवीन फॅट सेल्स कमी करते. तसेच त्याचा कायमस्वरूपी नायनाट करते. यासाठी फिश ऑईल सप्लीमेंट्स घेता येते.

अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड उपयोगी
सिरका हे अ‍ॅसिटिक अ‍ॅसिडचे एक पातळ फॉर्म आहे. ज्याचा ग्लुकोजवर कमी प्रभाव पडतो. आहारात एक चमचा सिरका मिसळ्याने ३० टक्के ब्लड शुगर कमी होते. सिरकामुळे बॉडीतील ब्लड शुगर आणि वजन नियंत्रणात राहते.

मैदा, पास्ता खाऊ नका
पांढरे पदार्थ खाऊ नयेत. त्या ऐवजी ब्राउन पदार्थ खाणे सुरु करा. पांढरा ब्रेड, भात, पास्ता आणि मैदा हे पदार्थ खाणे टाळावे.  तुम्ही लिंबू पाणी आणि हेल्दी फ्रेश फ्रूट यांचा आहारात सामावेश करावा.

हेल्दी पदार्थ खा
आहारात हिरव्या पदार्थांचा सामावेश करावा. यामुळे आरोग्य चांगले राहते. रोजच्या जेवणात हिरव्या भाज्यांचा खा. भात, पोहे यामध्ये देखील तुम्ही हिरव्या भाज्यांचा सामावेश करता येईल.

थोडे-थोडे खावे
भूख लागल्यास थोड्या-थोड्या अंतराने योग्य प्रमाणात खात राहा. दिवसातून ४ ते ५ वेळा थोडा-थोडा आहार घ्यावा. यामध्ये हेल्दी फुड्स घ्यावे.

ब्रेकफास्ट टाळू नका
दिवसाची सुरूवात हेल्दी ब्रेकफास्टने करा. बाहेरील जंक फूड खाणे टाळू शकता.

प्रोटीनयुक्त पदार्थ खा
वजन कमी करण्यासाठी बीफ, फिश, डेअरी आणि सोया प्रोटीन उत्तम आहे. प्रोटीनपासून बनवण्यात येणारे अमिनो अ‍ॅसिड बॉडीतील फॅट्स कमी करतात आणि बॉडीमध्ये प्रोटीन पचवण्यासाठी प्रोटीन हार्मोन रिलीज करते. दही, चीज आणि ऑर्गेनिक ग्रिल्ड चिकन हे पदार्थ प्रोटीनची मात्रा वाढवण्यास मदत करतात.

कॉफीन कमी करा
वजन कमी करण्यासाठी ब्लॅक टी प्यावी. कोफीनमुळे बॉडीतील कम्पाउंड सेल ब्रेक होतात. यामुळे मेटाबॉलिज्ममध्ये साठलेले फॅट बर्न करुन नवीन एनर्जी मिळते. ब्लॅक टी अथवा ग्रीन टी प्यावी.

फायबरचे पदार्थ खा
फायबर युक्त पदार्थ आहारात घेतल्याने वजन लवकर कमी होते. फायबर डायजेशन सिस्टिमला मदत करते. यामुळे बॉडीची एनर्जी लेव्हल आणि ब्लड शुगर वाढण्यास मदत होते.

जेवणानंतर ब्रश करा
जेवणानंतर ब्रश केल्याने दातांचे आरोग्य उत्तम राहते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. रात्री ब्रश केल्याने भूक कमी लागते. जेवल्यानंतर काही खाल्ल्याने वजन वाढते. वजन वाढू नये यासाठी रात्रीच्या जेवणानंतर न विसरता ब्रश करावा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु