ओठांवर आजाराचे ‘हे’ ६ संकेत दिसल्यास जा डॉक्टरांकडे !

ओठांवर आजाराचे ‘हे’ ६ संकेत दिसल्यास जा डॉक्टरांकडे !

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शरीराची विविध अंगे आपणास आजारांचा संकेत देत असतात. याप्रमाणे ओठही आपल्याला काही आजारांचे संकेत देत असतात. या संकेतांवरुन आपणास वेळीच सावध होता येते. फाटलेले ओठ हे डायबिटीजचे लक्षण असू शकते. शरीरात व्हिटॅमिन सी, नुट्रीएंट्सची कमतरता आणि इम्यून सिस्टम कमजोर झाल्यास ही समस्या होऊ शकते.

ओठांना सूज आल्यास हा अ‍ॅलर्जीचा संकेत आहे. कधी-कधी खाण्याची रिअ‍ॅक्शन आणि इन्फेक्शनमुळे ओठांवर सूज येते. ओठांवर किंवा ओठांच्या काठाचे साल निघणे हे इनडायजेशन, व्हिटॅमिन सी आणि बी-१२ च्या कमतरतेचा संकेत असू शकतो. डस्ट इन्फेक्शन आणि औषधांच्या साइडइफेक्ट्मुळेही साल निघतात. यामुळे असे संकत दिसून आल्यास डॉक्टरांकडे जावे.

व्हायरल इन्फेक्शन, डस्ट आणि इम्यून सिस्टम खराब झाल्यामुळे ओठांवर पुरळ उठण्याची समस्या होऊ शकते. तसेच ओठांचे काठ फाटणे हा व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता अथवा फंगल इन्फेक्शनचा संकेत असू शकतो. ओठ पिवळे पडणे हा अॅनीमिया म्हणजेच शरीरात रक्ताच्या कमतरतेचा संकेत असतो. असा संकेत दिसून आल्यास थकवा आणि कमजोरीची समस्याही जाणवते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु