योगासने सुरू करताय ? मग या सूचनांचे आवश्य पालन करा

योगासने सुरू करताय ? मग या सूचनांचे आवश्य पालन करा
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – गुप्त शक्तींना जागृत करण्यासाठी योगासने खूप आवश्यक आहेत. आसनांच्या अभ्यासाने शरीर निरोगी, मन प्रसन्न व बुद्धी तीक्ष्ण होते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सुखद स्वप्न साकार करण्याची गुरुकिल्ली अंतर्मनात असून अद्भुत सामर्थ्य प्रगट करण्यासाठी ऋषींनी समाधीतून प्राप्त झालेल्या या आसनांचे अवलोकन केले आहे. शौच-स्नानादीनंतर आसने केली गेली तर उत्तम असते. श्वास तोंडाने न घेता नाकानेच घेतला पाहिजे.

आसने केल्यानंतर थंडीत किंवा किंवा जोराच्या वाऱ्यात बाहेर निघू नये. स्नान करावयाचे असल्यास थोड्यावेळाने करावे. आसन करतेवेळी शरीरावर कमीतकमी व सैल कपडे असावेत. स्त्रियांनी गरोदर अवस्थेत तज्ज्ञांच्या सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही आसन करू नये. आसनानंतर थोडे ताजे पाणी पीणे लाभदायक ठरते. ऑक्सिजन व हायड्रोजनमध्ये विभाजन होऊन संधी स्थानातील भागातून मल काढण्यासाठी पाणी खूप आवश्यक असते.

योगासने करताना घोंगडी, पोते असे काही अंथरून त्यावरच आसने करावीत. उघड्या जमिनीवर काही न अंथरता कधीही आसने करू नयेत. ज्यामुळे शरीरात निर्माण झालेला विद्युत-प्रवाह नष्ट होणार नाही. आसन करताना शरीरासोबत जबरदस्ती करू नये. कारण आसन म्हणजे कसरत नसून व्यायामाचाच एक वेगळा प्रकार आहे, हे लक्षात असू द्यावे.

ही काळजी घेतली तर चेह‍ऱ्यावर पडणार नाहीत सुरकुत्या

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु