लसणाच्या सालीत आहेत ‘हे’ खास गुणधर्म, होतात खास फायदे

लसणाच्या सालीत आहेत ‘हे’ खास गुणधर्म, होतात खास फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन – लसणात अनेक औषधी गुणधर्म आहेत. तसेच त्याच्या सालींमध्येही अँटी बॅक्टेरियल, अँटी व्हायरल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात. यामध्ये एलिसिन कंपाउंड असतात. जे आरोग्याला खूपच उपयोगी आहे. लसणाचे साल बारीक करून त्वचेवर लावल्याने अनेक फायदे होतात. लसणाचे साल बारीक करून किंवा पाण्यात उकळून वापरावे. हे जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवल्याने न्यूट्रिएंट्स कमी होतात. यामुळे ताज्या लसणाच्या सालींचा वापर फायदेशीर आहे.

लसणाच्या सालीचे कोणते उपयोग आहेत, याविषयी आपण माहिती घेणार आहोत. लसणाचे साल पाण्यात टाकून उकळून घ्यावे. हे पाणी कोमट करून केस धुतल्याने केसगळतीची समस्या दूर होते. लसणाचे साल बारीक करून मुरुमावर लावावे. यामधील अँटी बॅक्टेरियल गुणधर्म मुरुम ठीक करण्यात मदत करते. तसेच लसणाचे साल पाण्यात टाकून उकळून गाळून प्यायल्याने सर्दी-पडशापासून आराम मिळतो. लसणाचे साल पाण्यात टाकून उकळून हे पाणी कोमट करून त्यामध्ये पाय ठेवल्याने पायांची सूज दूर होते. लसणाच्या पाकळ्या बारीक करून यामध्ये मध मिसळून ते सकाळ-संध्याकाळ घेतल्याने दम्याचा प्रभाव कमी होतो.

लसणाच्या सालींची पेस्ट बनवून त्यामध्ये लिंबूचा रस मिसळून केसांच्या मुळांवर लावल्याने उवा दूर होतात. लसणाच्या साली एका पॅनमध्ये गरम करून पावडर बनवावी. यामध्ये ऑलिव्ह ऑइल मिसळून केसांवर लावल्याने केसांचा रंग काळा होतो. लसणाच्या साल पाण्यात टाकून उकळून घेवून हे पाणी गार करून रोपांना टाकल्याने रोप लवकर वाढते. लसणाचे साल बारीक करून त्वचेवर लावल्याने दाद, खाजपासून आराम मिळतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु