मजबूत खांद्यांसाठी करा ‘ही’ ५ खास आसने, अशी घ्या काळजी

मजबूत खांद्यांसाठी करा ‘ही’ ५ खास आसने, अशी घ्या काळजी

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : खांदा शरीराचा महत्वाचा अवयव असल्याने तो मजबूत असणे गरजेचे असते. उभे रहाणे, झोपणे, उठणे, अशा विविध हालचाली यामुळेच शक्य होतात. खांद्याचा सांधा हा शरीरातील एक नाजूक व अस्थिर सांधा आहे. खांदा मजबूत नसल्यास तो निखळून गंभीर दुखापत होऊ शकते. अनेक हालचाली करताना त्रास होऊ शकतो. खांदे मजबूत करण्यासाठी कोणती योगासने करावीत, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

करा ही योगासने
मालासन
हे करताना पाठीवर चांगला ताण येतो. हे कठीण आसन केल्यावर श्वासावर लक्ष देऊन आराम करावा.

टिटीभासन
हे करताना तोल सांभाळणे किंचित जड जाते. पडणार नाही याची काळजी घ्यावी. या स्थितीमध्ये काही अंशात स्थिर रहाण्यासाठी ताकदीची गरज असते.

पर्वतासन
या आसनामध्ये डोक्याच्या दिशेने हात ताणले गेल्यामुळे खांद्यांसह सर्वांगाला चांगला ताण मिळून आराम मिळतो.

शिर्षासन
यामुळे खांद्याचे सांधे मजबूत होतात. हे करताना पाठीमागच्या दिशेने झुकताना खांदे पिळले जाणार नाहीत याची काळजी घ्या.

पवनमुक्तासन
यात पाठ व मान वर घेताना खांद्यांवर पुरेसा ताण येतो. त्यामुळे आसन सोडताना पाठ व मानेच्या मणक्याला आराम देताना खांदे सैल सोडावेत.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु