‘स्लिम फिगर’ आणि ‘फ्लॅट टमी’ साठी अवश्य करा ‘हे’ घरगुती उपाय, होईल फायदा

‘स्लिम फिगर’ आणि ‘फ्लॅट टमी’ साठी अवश्य करा ‘हे’ घरगुती उपाय, होईल फायदा
आरोग्यनामा ऑनलाइन – महिलांना स्लिम फिगर आणि फ्लॅट टमी चे खुपच आकर्षण असते. परंतु, हे मिळवण्यासाठी योग्य पद्धत कोणती, असा प्रश्न त्यांना नेहमीच पडलेला असतो. योग्य व्यायाम, योग्य आहार आणि चांगल्या सवयी यासाठी आवश्यक असतात. नियमितपणे याचे पालन केल्यास महिलांची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. स्लिम फिगर आणि फ्लॅट टमी मिळवण्यासाठी काय करावे, याची खास माहिती आपण जाणून घेणार आहोत.

अशी घ्या काळजी

१ पाणी प्या
दिवसातून कमीत कमी १०-१२ ग्लास पाणी अवश्य प्यावे. यामुळे मेटाबॉलीझम वाढते आणि वजन कमी होऊ लागते.

२ अन्न चावून खा
अन्न चावून-चावून खा. यामुळे ते सहजपणे पचते. पोटाच्या जवळपास अतिरिक्त चरबी जमा होत नाही.

३ सकाळचा नाश्ता
फ्लॅट टमी मिळवण्यासाठी सकाळी आठवणीने नाश्ता करा. ठरलेल्या वेळी जेवण करा. भरपूर खाण्यापेक्षा थोड्या-थोड्या अंतराने खात राहावे.

४  फॅटयुक्त पदार्थ टाळा
फॅट भरपूर असलेले मीट खाऊ नये. या ऐवजी तुम्ही पोटाला अनुकूल असे पदार्थ उदाहरणार्थ मासे, शेलफिश, लीन मीट इत्यादी पदार्थ खावेत.

५ व्यायाम करा
बॉलच्या मदतीने व्यायाम करा. पाठीवर झोपून गुडघे ९० अंशावर करा. गुढघ्याच्यामध्ये बॉल ठेवून हळू-हळू श्वासोश्वास करत पुढे येत पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. हा व्यायाम १५ मिनिट करा. यामुळे पोटाची चरबी कमी होते.

६ सोडियम
सोडियम आणि कार्बोनेटेड पेय कमी करावे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी आणि सकस आहार घ्या.

७ अ‍ॅब्डॉमिनल क्रंच
पाठीवर झोपा आणि गुडघे छातीपर्यंत घेऊन या. हात डोक्याखाली ठेवा आणि खांदे जमिनीपासून थोडे वर उचला. पुन्हा पूर्वस्थितीमध्ये या. हा व्यायाम १२ वेळेस नियमित करा.

८ प्रोटीन घ्या
प्रोटीनचे प्रमाण कमी करू नका. मसल्स निर्मितीसाठी आणि फ्लॅट टमीसाठी प्रोटीनची आवश्यकता असते.

९ ग्रीन टी
चहा आणि कॉफीपेक्षा रोगप्रतिकारकशक्ती वाढविणारा ग्रीन टी सेवन करा. यामुळे लठ्ठपणा वाढत नाही. ग्रीन टी कॅमेलिया सायनेंसिसची पाने वाळवून तयार केला जातो.

कंबरेचा व्यायाम
सरळ उभे राहा आणि हातामध्ये पाण्याने भरलेल्या दोन बॉटल घ्या. त्यानंतर कंबर उजव्या बाजूला वाकवून पुन्हा पूर्वस्थितीमध्ये या. १६ वेळेस असेच करा. त्यानंतर पुन्हा डाव्या बाजूला अशाच प्रकारे कृती करा.

फळांचा रस
फळांचा रस सेवन केल्यास वजन कमी होते. साखर टाकू नका.

शांत झोप
भरपूर झोप घेतल्यानेही पोटाची चरबी कमी होते. योग्य झोप भुकेचे हार्मोन घेर्लीन आणि लेप्टिनला नियंत्रित करते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु