‘या’ ५ टिप्स फॉलो करून करा कुबडेपणावर करा मात

 
‘या’ ५ टिप्स फॉलो करून करा कुबडेपणावर करा मात

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपण पाहतो की अनेकजण चालताना कुबडे चालतात. बसताना कुबडे बसतात. अशा लोकांमध्ये अनेकदा आत्मविश्वास कमी आहे असं दिसतं . पाठ सरळ न झाल्यामुळे त्यांना मणक्याचा त्रास उदभवण्याची दाट शक्यता आहे.  तुम्हाला जर तुमच्या कुबडेपणावर मात करायची असेल तर खालील टिप्स फॉलो करा.

१) लहान मुले आणि युवकांसाठी, खासकरून जेव्हा ते कॉम्प्युटरसमोर बसून काम करतात, तेव्हा त्यांना बरोबर पद्धतीने बसण्याची माहिती असणे गरजेचे आहे.  आपल्या दोन्ही बाह्यांना आराम मुद्रामध्ये आणि शरीराला लागून ठेवायला हवे आणि टायपिंग करतेवेळी आपल्या भुजांना डेस्कवर ठेवायला हवे.

२) जेव्हा तुम्ही  कॉम्प्युटरवर  काम करता तेव्हा तुमची आयब्रो कॉम्प्युटरच्या वरच्या भागाच्या स्क्रीन समोर समांतर रेषेत असायला हवेत आणि आपली बसण्याची खुर्ची पुढील बाजूस थोडी झुकलेली असावी. जेणेकरून आपले पाय जमिनीला टेकू शकतील.

३) तसेच युवकांनी आणि वयस्कर व्यक्‍तींनी स्ट्रेचिंग सारखे व्यायाम नियमितपणे केले तर त्यांच्या स्पाईनल कॉर्डची लवचिकता वाढण्यासाठी खूप जास्त मदत मिळू शकते. युवकांनी पोटाच्या मांसपेशी मजबूत करण्यावर जोर देणं गरजेचं आहे.

४) तुम्हाला जर तुमचा कुबडेपणा घालवायचा असेल तर नियमितपणे योगाभ्यास केला तर तो शरीराच्या होणार्‍या दिवसभरातील होणार्‍या हालचाली विकसित करता करता आपल्याला ही लाभदायक ठरतात. योग मनाचे, शरीराचे संतुलन सुद्धा चांगल्या प्रकारे ठेवतो.

५) तुम्ही राहातांनाही आपण सरळ उभे राहिले तर आपला आत्मविश्‍वास ही वाढीस लागतो. तसेच बसताना ही आपल्या खांद्यांना सरळ आणि वर्गाकार ठेवा, डोके वरच्या बाजूला आणि मान, पाठ हे सरळ रेषेत हवे. असे केल्याने तुम्ही तुमच्या कुबडेपणावर मात करू शकता.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु