थकवा कशामुळे येतो, जाणून घ्या यामागील कारणे

थकवा कशामुळे येतो, जाणून घ्या यामागील कारणे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोणतेही शारीरीक काम करत असताना ठराविक वेळेनंतर थकवा येतो. ही एक सामान्य बाब आहे. कष्ट केल्यानंतर थकवा येत असतो. कष्ट हे शारीरीक आणि मानसिक असे दोन प्रकारचे असतात. या दोन्ही कष्टांमुळे थकवा हा येतोच. मात्र, थकवा किती वेळाने येतो, हे खूप महत्वाचे आहे. अनेकदा थोडे काम केले तरी थकवा येतो. पायèया चढताना, उतरताना त्रास होतो. वजनदार वस्तू उचलल्यानंतर धाप लागते, याचा अर्थ तुम्हाला लवकर थकवा येत आहे. नेहमी थकवा येणे हे अनेक आरोग्य समस्यांचे संकेत असू शकतात. अशाप्रकारे थकवा का येतो, याच्या मुळाशी गेल्यानंतर त्यामागील कारणे समोर येतात. ही कारणे समजली तर उपाय करणेही सोपे होते.

शरीरात लोहाची कमतरता असते तेव्हा व्यक्तीच्या शरीरात रक्ताची कमतरता जाणवते. मासिक पाळी, गर्भावस्था आणि बाळाला स्तनपान करर्णाया महिलांना ही समस्या जास्त भेडसावते. यामुळे अ‍ॅनिमिक होण्याची शक्यताही वाढते. याशिवाय मधुमेह असलेल्यांच्या शरीरात ब्लड शुगरच्या अनियमिततेमुळेही थकवा येऊ शकतो. लिव्हरशी संबंधित समस्या समस्या असल्यास थकवा जाणवतो. हानिकारक व्हायरसमुळे लिव्हरला इजा पोहोचत असल्यास नेहमी थकवा येऊ शकतो. लिव्हरची कार्यप्रणाली असामान्य होणे किंवा एखादा संसर्ग झाल्यावरच हा त्रास होतो.

हृदयरोग असलेल्या व्यक्तींनाही थकवा लवकर येऊ शकतो. शारीरिक थकवा आणि हृदयाशी संबंधित समस्या यांचा एकमेकांशी संबंध आहे. संशोधकांनी हृदयरोगाने पीडित लोकांवर संशोधन केले असता त्यांच्यापैकी ७० टक्के लोकांनी नेहमी थकवा जाणवत असल्याचे सांगितले. तसेच आर्टरिजमध्ये होणारा रक्तप्रवाह बाधित झाल्यास असे होऊ शकते. शिवाय, थायरॉइडशी संबंधित समस्या असल्यास थकवा जाणवतो. ३० ते ४५ वर्षांच्या मध्यम वयाच्या महिला व पुरुषांना अनेकवेळा थायरॉइड ग्रंथींच्या सामान्यापेक्षा कमी सक्रियतेमुळेही अधिक थकवा जाणवू शकतो.

या ग्रंथी गळ्यात असतात आणि टी ३ व टी ४ हार्मोन सक्रिय करतात. यामध्ये कमतरता आल्याने वजन वाढणे, खूप थंडी वाजणे, मलावरोध, त्वचा रुक्ष होणे आणि केस गळणे यासारख्या समस्या उद्भवतात. वरील कारणांमुळे अनेकदा थकवा येतो. म्हणजेच थकवा हा विविध आजारांचा संकेत असू शकतो. मात्र, खूप परिश्रम केल्यानंतर येणारा थकवा हा सामान्य असतो. त्यामुळे असे परिश्रम केल्यानंतर थकवा आल्यास काळजी करण्याचे कारण नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु