वयाच्या पंचेचाळिशीत मलायका कशी आहे फिट, जाणून घ्या तिचा ‘डाएट प्‍लॅन’

वयाच्या पंचेचाळिशीत मलायका कशी आहे फिट, जाणून घ्या तिचा ‘डाएट प्‍लॅन’

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री मलायका ही वयाच्या पंचेचाळिशीतही एकदम सडसडीत आणि एनर्जेटिक दिसते. तिच्या या सुंदर शरीराचे रहस्य जाणून घेण्याची इच्छा अनेकांना असते. हे रहस्य तिनेच काही मुलांखतींमध्ये सांगितले आहे. ते जाणून घेवूयात.

असा आहे डाएट प्लॅन

ती रात्रीच्या जेवणात ग्रिल्ड सेलमॉन मासे, सूप, उकळलेल्या भाज्या आणि सलाद खाते.

नाष्ट्यात अंड्याबरोबर मल्टी ग्रेन टोस्ट, इडली आणि फळे खाते. दुपारच्या नाष्ट्यात आवळ्यांसोबतच भाज्यांचा रस, अंडे, ब्रेड टोस्ट खाते.

दुपारच्या जेवणात भात, ज्वारी आणि बाजरीची भाकरी, चिकन, मासे, अंकुरित धान्य, डाळ आणि हिरव्या भाज्या घेते.

ती दिवसातून अनेक वेळा नारळ-पाणी, व्हेजिटेबल ज्यूस आणि ग्रीन टी पिते.

एकाच वेळी जास्त जेवण करण्याऐवजी मलाइका दिवसातून अनेक वेळा थोडे-थोडे जेवण करते. सायंकाळी साडेसातच्या आधी ती जेवते.
तेलकट, जास्त मीठ असलेले पदार्थ खाणे मलाइका टाळते. एक्स्टड्ढा वर्जिन ऑलिव्ह ऑइलमधील पदार्थ तिला आवडतात.

तिला गोड आवडते. ती गुळाची मिठाई आणि टी केक खाणे पसंत करते.

सकाळी उठल्यानंतर ती नियमित एक ग्लास गरम पाण्यात मध आणि लिंबू टाकून पिते. त्यानंतर अध्र्या तासाने ती एक लिटर पाणी पिते.

 

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु