मुलांच्या वागणुकीत बदल झाल्यास घ्या ‘या’ कारणांचा शोध

मुलांच्या वागणुकीत बदल झाल्यास घ्या ‘या’ कारणांचा शोध

आरोग्यनामा ऑनलाइन – आपला मुलगा अथवा मुलगी अनेकदा समजावूनही अभ्यास करत नसतील, लक्ष देत सतील तर चिडचिड करू नका. यामागील कारणे शोधा. असे करण्यामागे कंटाळा, आळस हीच कारणे आहेत असे समजू नये. कारण यामागे अन्यही कारणे असू शकतात. प्रथम आपल्या मुलांच्या कान, डोळे तपासून घ्या. अनेकदा ऐकू येणे, कमी दिसणे यामुळेही मुले अभ्यासात मागे पडतात. अशावेळी मुलांवर जोरजबदस्ती केल्यास मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होतो.

मुलांच्या खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या सवयींकडेही लक्ष दिले पाहिजे. पुरेशी झोप मिळत नसेल तरीही मुलांचे वागणे, बोलणे यामध्ये बदल होतो. कौटुंबिक कलह, बालकांचे लैंगिक शोषण ही कारणेही नीट तपासली पाहिजेत. यासाठी आवश्यक वाटल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडून डोळे, कान यांची तपासण्या करून घ्यावी. आवश्यक वाटल्यास आयक्यू टेस्ट करून घेतली पाहिजे. काही मुलांमध्ये लिहिणे, वाचन करणे किंवा साधी गणिते सोडवणे शक्य होत नसेल तर त्याला काही लर्निंग डिस्ऑर्डरसारखी समस्या आहे का हे तपासून घ्यावे. अशाप्रकारे योग्यवेळी उपाचार केल्यास मुलांची शैक्षणिक प्रगती होऊ शकते. मुलांचेही वेगवेळे स्वभाव असतात. काही खोडकर तर काही खूपच शांत असतात. परंतु मुलांच्या वागणुकीत कमालीचा बदल आढळल्यास त्याचे कारण शोधले पाहिजे. हे तर सामान्य आहे असे म्हणून अशा समस्यांकडे दुर्लक्ष करू नये.

कारण पुढे हेच त्रासदायक होऊ शकते. एखादा मुलगा खूपच खोडकर असल्यास हा अटेन्शन डेफिसिट हायपरअ‍ॅक्टिव्हिटी डिस्ऑर्डरचा प्रकार असू शकतो. यात मुले एका विशिष्ट कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. अशी मुले सतत वेगवेगळे कार्य करतात. एकाग्रतेचा त्यांच्यात अभाव दिसून येतो. त्यांच्या वागण्यात सतत बदल होत असतो. मुलांमध्ये अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरकडून तपासणी करून घ्यावी. योग्य वेळी उपचार केल्यास त्याची मानसिक, बौद्धिक व शारीरिक वाटचाल सामान्यपणे होऊ शकते. कुटुंबात कुणाला असा त्रास असल्यास मुलांमध्ये तो असण्याची शक्यता बळावते. लर्निंग डिस्ऑर्डर ही देखील मुलांमध्ये सर्रास आढळणारी समस्या आहे. आपल्या बोलण्याकडे मुलाने लक्ष न देणे, मुलांकडून छोट्या-छोट्या चुका होणे, कामात, अभ्यासात एकाग्रता नसने, जास्त वेळ एका जागी न बसणे, सांगितलेले काम करण्यास टाळणे, कशातच मन न लागणे, विसरभोळेपणा, वस्तू न सापडणे, असे आढळून आल्यास अशा मुलांकडे लक्ष देऊन योग्यवेळी तज्ज्ञांकडून उपचार करून घेतले पाहिजेत.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु