कमजोरी जाणवते का ? दररोज बदाम, अननस आणि लिंबाचे करा सेवन

कमजोरी जाणवते का ? दररोज बदाम, अननस आणि लिंबाचे करा सेवन

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीराला पोषक आहार न मिळाल्यास कमजोरी जाणवते. विशेषता महिला आहाराकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांना कमजोरीची समस्या जास्त प्रमाणात जाणवते. त्यामुळे शरीराला पूर्ण पोषण देणारे पदार्थ आहारात असणे खूप आवश्यक आहे. आहारात काही खास खाद्यपदार्थांचा समावेश केल्यास शरीराचे योग्य पोषण होऊ शकते. हलका-फुलका आहार ऊर्जा आणि उत्साह वाढवतो. शरीराची कमजोरी दूर करून ऊर्जा वाढविण्यासाठी कोणता आहार घ्यावा, याबाबत आपण माहिती घेऊयात.

लिंबू पाणी शरीराला तत्काळ ऊर्जा देते. यातील व्हिटॅमिन सी काही वेळातच उत्साह वाढवते. सकाळी लिंबू पाणी पिल्याने व्यक्ती दिवसभर उत्साही राहतो. तसेच अननसात मुबलक प्रमाणात मँगेनीज, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी १, कॉपर, फायबर असते. यात साखरेचे प्रमाण देखील चांगले असल्याने तत्काळ ऊर्जा मिळते. अननसातील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते. अननस ज्यूस पिणे अत्यंत फायद्याचे आहे. दररोज एक ग्लास अननस ज्यूस प्यावा.

तसेच मोड आलेले धान्य ऊर्जेचा चांगला स्रोत आहे. मोड आलेल्या धान्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन बी १, बी २, बी ३, प्रोटीन, काबरेहायड्रेट असल्याने शरीर आणि मन निरोगी, तंदुरुस्त राहते. रोजच्या आहारात १०० ग्रॅम मोड आलेल्या धान्याचा समावेश करावा. तसेच बदामात ऊर्जा वाढवणारे सर्व आवश्यक घटक आढळतात. यात मॅगनीज, व्हिटॅमिन ई, ताबे, आणि व्हिटॅमिन बी १२ असते. सकाळी-सकाळी बदाम खाल्ल्याने मेंदू तल्लख होतो. शरीरात उत्साह संचारतो. किमान पाच बदाम रोज सकाळी दुधासोबत खाणे लाभदायक ठरू शकते. दहीसुद्धा उर्जावर्धक आहे. दह्यात कॅल्शियम असल्याने हाडांना मजबुती मिळते. यात मोलेबेडिनम, झिंक, व्हिटॅमिन बी-२ आणि बी-५ देखील असते. आहार पचवण्यासाठी दह्याची मोठी मदत होते. आहार पचल्याने शरीराला तत्काळ ऊर्जा मिळते. दररोज १०० ग्रॅम दही खाणे लाभदायक आहे.

‘हार्ट अ‍ॅटॅक’ पासून दूर राहण्यासाठी आहारातील ‘हे’ पदार्थ कटाक्षाने टाळा
पावसाळ्यात पायांना पडणाऱ्या भेगांपासून ‘अशी’ घ्या पायाची काळजी
काय सांगताय ! मेहंदी केवळ ‘सौंदर्यच’ नाही तर ‘आरोग्यही’ खुलवते
मेंदूलाही असते व्यायामाची गरज, मानसिक उर्जेसाठी आवश्यक
‘आयंगर योगा’ करा आणि तणावमुक्त व्हा, आणखीही आहेत फायदे

तणाव नियंत्रणात ठेवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
जाणून घ्या ‘अगस्ता वनस्पती’चे औषधी फायदे
‘नासलेलं दूध’ही आहे सौंदर्यवर्धक ; जाणून घ्या फायदे
पावसाळ्यात घ्या अशी काळजी, अरोग्य राहील चांगले
कडूलिंबाच्या पानांचा हा फेसपॅक तुमचे सौंदय आणखी वाढवेल
पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक चहांचे सेवन करा

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु