आवडीच्या पदार्थांनीही वाढू शकते हिमोग्लोबिन, ‘हे’ पदार्थ खाल्ले तर होईल फायदा

आवडीच्या पदार्थांनीही वाढू शकते हिमोग्लोबिन, ‘हे’ पदार्थ खाल्ले तर होईल फायदा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी योग्य राखणे खूप आवश्यक असते. मात्र, हिमोग्लोबिन कमी झाले तर घाबरून न जाता काही उपाय करून त्याची पातळी वाढवता येऊ शकते. यासाठी औषधे घेण्यापेक्षा आवडणारी फळे खाऊन एचबीची पातळी वाढवता येते.

हे पदार्थ खा
ब्राऊन राइसमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. बटाट्यातही लोह आणि व्हिटॅमिन-सी आहे. म्हणजेच दुप्पट फायदा होतो. डार्क १०० ग्रॅम चॉकलेटमध्ये १७ मिलिग्रॅम लोह असते. १०० ग्रॅम भोपळ्यांच्या बियांमध्ये १५ मिलिग्रॅम लोह असते. एका दिवसात ८३ टक्के लोहाची आवश्यकता पूर्ण करते. १०० ग्रॅम पालक म्हणजेच २.७ मिलिग्रॅम लोह असते. कोरडे जर्दाळू आणि किसमिस याचे उत्तम स्रोत आहे.

हे लक्षात ठेवा
१)
जास्त लोहामुळे उलट्या, नॉशिया, डायरिया, ताप आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. लोह हायडोस होऊ शकतो. शरीरात टॉक्सिन प्रॉडक्शन सुरू केले तर ते धोकादायक होऊ शकते.

२) औषधांनी हिमोग्लोबिन वाढवताना डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. योग्य डोस घेतला पाहिजे.

ही आहेत लक्षणे
*
थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे, त्वचा पिवळी पडणे, कमकुवत नखे-दात, श्वास घेण्यास त्रास.

ही आहेत कारणे
अयोग्य आहारामुळे शरीरातील हिमोग्लोबिन कमी होते. तसेच अन्यदेखील कारणे यामागे आहेत. आहारात लोहाची कमी, शरीरात लोहाचा वापर न होणे, रक्तस्राव, अपघातामुळे हॅमरेज, अल्सर, मॅनस्युरेशन, यामुळे देसुद्धा हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु