किमान ३० मिनिटे रोज व्यायाम करा…आणि अनुभवा आश्चर्यकारक फायदे

किमान ३० मिनिटे रोज व्यायाम करा…आणि अनुभवा आश्चर्यकारक फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित व्यायाम करणे खुप गरजेचे आहे. परंतु, काही आळशी लोक; वेळ नसल्याचे सांगून व्यायाम करणे टाळतात. यामुळे त्यांना विविध आरोग्य समस्या तरूण वयातच जडतात. सकाळी लवकर उठून अवघी काही मिनिटे व्यायाम केल्याने शरीर नेहमी फिट राहते. यासाठी तासनतास घाम गाळण्याची गरज नाही. रोज केवळ तीस मिनिटे व्यायाम केल्यास अनेक आश्चर्यकारक फायदे होऊ शकतात. हे फायदे कोणते हे जाणून घेवूयात.

हे आहेत ६ फायदे

१) व्यायाम केल्याने शरीरातील पेशींना आवश्यक पोषकतत्त्वे आणि ऑक्सिजन मिळतो. यामुळे उर्जा पातळी वाढते.

२) रोज तिस मिनिटे व्यायाम केल्याने शरीर क्रियाशिल होते. यामुळे चांगले कोलेस्टेरॉल म्हणजेच एचडीएलचा स्तर वाढतो. यामुळे ह्रदय आणि ब्लड प्रेशरसारख्या समस्या दूर होतात. ह्रदयापर्यंत रक्तप्रवाह सुरळीत होतो. कॉर्डियोवैस्कुलरसंबंधी समस्या निर्माण होत नाही.

३) व्यायामामुळे नॉरपिनाफ्रिन नावाचे ब्रेन केमिकल वाढते. यामुळे तणावाशी लढण्यास मदत होते. या ब्रेन केमिकलची मात्रा वाढल्याने मानसिक ताण कमी होतो.

४) व्यायाम केल्याने जास्त प्रमाणात मेमरीच्या भागात सेल्सची निर्मिती होते. यांना हिप्पोकॅम्पस म्हणतात. यामुळे विचार, स्मृती आणि शिकण्याची क्षमता वाढते.

५) रोज फक्त अर्धा तास व्यायाम केल्याने वजन कमी होऊ शकते. व्यायामाने उर्जा पातळी नियमित राहते. व्यक्ती दिवसभर फिजिकली अ‍ॅक्टिव्ह राहतो. यामुळे जास्त खाणे न झाल्याने वजन वाढत नाही.

६) रोज व्यायाम केल्याने ब्लड शुगर लेवल कमी होते. पॅँक्रियाजचे कार्य सुरळीत होऊन शरीरात इन्शुलिनची चांगली निर्मिती होते. टाइप-२ डायबिटीजचा धोका कमी होतो.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु