कॅटरिनासारखी ‘टॉवेल एक्झरसाइज’ करा आणि ‘स्लीम’ व्हा

कॅटरिनासारखी ‘टॉवेल एक्झरसाइज’ करा आणि ‘स्लीम’ व्हा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री कॅटरिना कैफ लवचिक शरीर आणि तिच्या खास डान्स मूव्हजसाठी ओळखली जाते. शिवाय, ती बॉलिवूडच्या सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. फिटनेससाठी मोठमोठ्या उपकरणांची आवश्यकता नसल्याचे कॅटरिनाचे वर्कआउट पाहिल्यानंतर दिसते. एका साधारण टॉवेलद्वारा कंबर सुडौल बनवून शरीर फिट ठेवता येते हे तिने दाखवून दिले आहे. टॉवेल एक्झरसाइज करतानाचा तिचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होतो. या टॉवेल एक्झरसाइजचे फायदे आणि कॅटरिनाच्या आहाराबाबत आपण माहिती घेणार आहोत.

हे आहेत फायदे
१.
टॉवेल एक्झरसाइजद्वारे शरीराचा वरचा भाग आणि छातीवर सकारात्मक परिणाम दिसून येतो.

२. कमरेखालील भाग मजबूत होतो.

३. ही एक्झरसाइज अतिशय सोपी आहे. घरीसुद्धा सहज करता येते.

हा आहे तिचा डायट प्लॅन
*
ती फिट राहण्यासाठी लीन मीट, स्वच्छ आणि हिरवा भाजीपाला आहारात घेते.

* मेटाबॉलिज्म वाढविण्यासाठी दर दोन तासांनी ती काहीतरी सेवन करते.

* शरीरात चरबी वाढू नये म्हणून ती खूप काळजी घेते.

* ती तेलकट पदार्थ तसेच सॅचुरेटेडे फॅटयुक्त पदार्थ अजिबात सेवन करत नाही.

* साखरेच्या पदार्थांऐवजी ती गुळ किंवा मधयुक्त पौष्टिक पदार्थांचे सेवन करते.

* शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी ती भरपूर पाणी सेवन करते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु