‘हे’ चिमूटभर नैसर्गिक ‘माऊथ फ्रेशनर’ खा, होतील अनेक फायदे

 
‘हे’ चिमूटभर नैसर्गिक ‘माऊथ फ्रेशनर’ खा, होतील अनेक फायदे
आरोग्यनामा ऑनलाइन टीम : जेवण केल्यानंतर चिमुटभर माउथ फ्रेशनर खाल्ल्याने फक्त तोंडाची दुर्गंधी होते. शिवाय डायजेशन सुरळीत राहते. यामधील फायबर आणि अँटीऑक्सीडेंट्स अनेक आजारांमध्ये फायदेशीर असते. यासाठी कोणते पदार्थ कशासाठी उपयोगी आहेत ते पाहुयात.
धना डाळीत यामध्ये अँटीऑक्सीडेंट्स असतात जे तोंडाचे इंफेक्शन टाळतात. त्यामुळे जेवणानंतर थोडी धनाडाळ खावी. बडीशोपमध्ये फायबर अधीक असते. हे खाल्ल्याने बध्दकोष्ठता दूर होते. तर ओव्यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात. जे तोंडाची दुर्गंधी दूर करण्यात मदत करतात. विलायची खाल्ल्याने तोंडामध्ये सलाइवा जास्त तयार होते आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळतो.
तर आवळा सुपारीमधील फायबर डायजेशन इंप्रूव्ह करण्यात मदत करतात. लवंग किंवा त्याच्या पावडरमध्ये यूजोनॉल असते. हे पोटाची प्रॉब्लम, पायरियापासून बचाव करण्यात मदत करतात. मुलेठीमध्ये पाणी अधिक असते. हे खाल्ल्याने तोंड येण्याची समस्या दूर होते. त्यामुळे या गोष्टींचा मुखशुद्धी म्हणून नियमित वापर केल्यास आरोग्यही चांगले राहते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु