रोज खा एक केळे, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती, ‘हे’ आहेत १० फायदे

रोज खा एक केळे, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती, ‘हे’ आहेत १० फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – दिवसभराच्या धावपळीत अनेकांना आपल्या आहाराकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. योग्य आहार न मिळाल्याने आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. परंतु, काही छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचे आरोग्य चांगले राहू शकते. अन्य आहारासोबत तुम्ही दिवसातून केवळ एक केळे खाल्ले तरी शरीराला आवश्यक असलेले अनेक महत्वाचे घटक मिळतात. एक केळे खाल्ल्याने किती फायदा होतो, हे जाणून घेवूयात.

होतील हे फायदे

१) युरिनरी इन्फेक्शन
यातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे लघवीतून होणारे संसर्ग टळतात.

२) स्मरणशक्ती
केळीत बी६ भरपूर प्रमाणात असल्याने मेंदू चांगल्याप्रकारे काम करतो. स्मरणशक्ती वाढते.

३) अ‍ॅनिमिया
केळ्यात मोठ्याप्रमाणात डायटरी फायबर असते. हे रक्तातील हिमोग्लोबिन वाढविण्यास मदत करते. यामुळे अ‍ॅनिमियासारखा आजार होत नाही.

४) अल्सर
केळी खाल्ल्याने पोटातील अल्सरचे बॅक्टेरिया मरतात. अल्सरमध्ये आराम मिळतो.

५) निरोगी हृदय
केळीत भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमीन बी ६, फायबर, व्हिटॅमिन सी असते. केळी रोज खाल्ल्याने कोलेस्टेरॉल कमी होऊन हृदय निरोगी राहते.

६) रक्तदाब
केळीत पोटॅशियम असते. हे खाल्ल्याने शरीरातील सोडियम संतुलित राहते. रक्तदाब नियंत्रणात राहतो.

७) अ‍ॅन्टी एजिंग
केळीत व्हिटॅमीन सी असते. यामुळे चेहरा तजेलदार होतो. वाढत्या वयाचा परिणाम कमी होतो.

८) रोगप्रतिकारक शक्ती
यातील कॅरोटेनॉइड्स तत्वामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्दी-पडशासारखे आजार होत नाहीत.

९) अशक्तपणा
केळी खाल्ल्याने ताबडतोब उर्जा मिळते. नियमित खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो.

१०) डायजेशन
केळीत भरपूर प्रमाणात फायबर असल्याने अपचनाच्या समस्या दूर होतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु