सकाळी लिंबूपाणी पिल्‍याने फॅट कमी होत नाही, ‘या’ आहेत ५ गैरसमजूती

सकाळी लिंबूपाणी पिल्‍याने फॅट कमी होत नाही, ‘या’ आहेत ५ गैरसमजूती
आरोग्यानामा ऑनलाइन टीम – सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून आणि मध टाकून घेतल्यास चरबी कमी होते, असे काही जण सांगतात. तर तज्ज्ञ सांगतात की, सकाळी लिंबूपाणी प्यायल्याने फॅट कमी होत नाही. याचेही अनेक मिथ आणि फॅक्‍ट्स आहेत. चुकीच्‍या वेळी लिंबूपाणी पिल्‍याने शरीराला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. लिंबूपाण्‍याविषयी काही मिथ आणि फॅक्‍ट्स आपण जाणून घेणार आहोत.
रिकाम्‍या पोटी लिंबू पाणी पिल्‍याने फॅट कमी होते. असा अनेकांचा समज आहे. मात्र असे काहीही नाही. लिंबामध्‍ये असे कोणतेही तत्‍व नसते ज्‍यामुळे फॅट विरघळते.

रोज सकाळी लिंबू पाणी पिणे जास्‍त फायदेशीर असते, असे म्हटले जाते. परंतु, रोज सकाळी लिंबू पाणी पिल्‍याने दातांमधील इनेमलचे नुकसान होते. सकाळी ब्रश केल्‍यानंतर एका तासाने लिंबू पाणी पिल्‍याने याचा फायदा होतो.

लिंबू पाण्‍यामुळे शरीरातील कॅलरी वाढत नाही, असे म्हटले जाते. पण लिंबू पाण्‍यामध्‍ये मध टाकून प्यायल्यास यामुळे कॅलरी वाढू शकतात. कारण मधामध्‍ये भरपूर शुगर असते ज्‍यामुळे शरीरात जादा कॅलरीज बनतात.

लिंबू पाणी शरीराला डिटॉक्‍स करते, असे म्हणतात. पण लिंबू पाण्‍यामध्‍ये असे कोणतेही तत्‍व नाही, ज्‍यामुळे शरीर डिटॉक्‍स होते, असे तज्ज्ञ सांगतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु