तुम्ही उभे राहून पाणी पिता का ? मग तुमच्यासाठीच आहेत ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

तुम्ही उभे राहून पाणी पिता का ? मग तुमच्यासाठीच आहेत ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दिवसभरात भरपूर पाणी पिण्याचा सल्ला आहार तज्ज्ञ देतात. कारण, यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. त्यामुळे पाणी हे शरीरासाठी खुप आवश्यक असते. माणसाच्या शरीरात पाण्याची मात्रा सर्वाधिक असते. पाण्याशिवाय शरीर योग्य प्रकारे काम करत नाही. पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास अनेक गंभीर समस्या निर्माण होतात.

शरीरासाठी पाणी अत्यावश्यक असले तरी ते योग्य प्रमाणात आणि योग्य पध्दतीने पिणेही गरजेचे असते. घाईघाईत आणि उभे राहून पाणी पिणे शरीरासाठी घातक असते. यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे कोणते दुष्परिणाम होतात, याची माहिती आपण घेणार आहोत.

तहान शमत नाही
उभे राहून पाणी प्यायल्याने तहान शमत नाही. त्यामुळे सतत पाणी प्यायले जाते. पाणी नेहमीच बसून हळूहळू एक एक घोट प्यावे.

अपचन
पाणी बसून प्यायल्यास स्नायू आणि मज्जासंस्था यांना विश्रांती मिळते. त्यामुळे पातळ पदार्थ पचण्यास मदत होते. मात्र, उभ्याने पाणी प्यायल्यास सतत अपचनाचा त्रास होतो.

सांधेदुखी
शरीराच्या सांध्यांतील द्रवपदार्थांचे संतुलन बिघडते. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास होतो.

किडनी
उभे राहून पाणी प्यायल्यास ते शरीरातून थेट वाहून जाते. किडनी आणि मूत्राशयातील घाण तशीच राहते. त्यामुळे मूत्रमार्ग किंवा किडनीत संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु