तुम्हाला ऑफिसमध्ये झोप येते का ? जाणून घ्या उपाय

तुम्हाला ऑफिसमध्ये झोप येते का ? जाणून घ्या उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – ऑफीसमध्ये गेल्यावर झोप येते, काही काम होत नाही. आणि करावं ही वाटत नाही. या समस्येवर काही उपाय करावा. अशा अनेकांच्या तक्रारी असतात. परंतु, तुम्हाला ऑफिसमध्ये गेल्यावर झोप येत असेल आणि काही उपाय सापडत नसतील तर आम्ही तुम्हाला काही उपाय सांगत आहोत. ते उपाय जर केले तर तुम्ही ऑफिसमध्ये येणाऱ्या झोपेवर नियंत्रण मिळवू शकता.

ऑफिसमध्ये झोप येऊ नये यासाठी उपाय पुढीलप्रमाणे
१)
ऑफिसमध्ये झोप येत असेल तर या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही सकाळी किती वाजता उठता हे महत्वाचं आहे. त्यामुळे अगोदर तुमची रात्री झोपण्याची वेळ नक्‍की करा. म्हणजे व्यवस्थित झोप झाली तर तुम्हाला दिवसभर ऑफिसमध्ये झोप येणार नाही.

२) तुम्ही रात्री उशिरा झोपून सकाळी जर लवकर उठण्याचा प्रयत्न केला. तर शरीरांतर्गत व्यवस्थेला धक्‍का बसतो.

३) तुम्हाला जर ९ वाजता उठण्याची सवय असल्यास आधी ८:३० चा अलार्म लावावा. ही वेळ दर आठवड्याला अर्धा-अर्धा तास अशी कमी करीत आणावी व नंतर आपल्या अपेक्षित वेळेवर यावे.

४) रात्री होणारे जागरण संपूर्णपणे टाळावे. व रात्री झोपण्याची वेळ निश्‍चित करावी. आपला कॉम्प्युटर, टीव्ही व मोबाईल झोपण्याच्या अर्धा तास आधी बाजूला ठेवून द्यावा. कारण झोपण्यापूर्वी मन शांत असणे खूप महत्त्वाचे आहे.

५) झोपण्यापूर्वी अनुलोमविलोम इत्यादी दीर्घ व सावकाश असे श्‍वसनाचे व्यायाम करावेत. त्यामुळेही शांत झोप लागते. विश्रांती व त्यासाठी झोप ही माणसाला श्रमपरिहारासाठी मिळालेली सर्वात मोठी नैसर्गिक सोय आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु