खुर्चीवर बसून करा व्यायाम, जिममध्ये जाण्याची गरज नाही, होतील ‘हे’ फायदे

खुर्चीवर बसून करा व्यायाम, जिममध्ये जाण्याची गरज नाही, होतील ‘हे’ फायदे

आरोग्यानामा ऑनलाइन – धावपळीच्या दिनक्रमामुळे अनेकांना व्यायाम करण्यासदेखील वेळ मिळत नाही. तसेच आठ-आठ तास एकाच ठिकाणी बसून काम केल्याने लठ्ठपणा, मानदुखी, कंबरदुखी, खांदेदुखी असे विविध त्रास सुरू होतात. हे त्रास टाळण्यसाठी व्यायाम खूप आवश्यक आहे. यासाठी वेळ नसल्याने तुम्ही जिममध्ये न जाता खुर्चीवर बसूनसुद्धा व्यायाम करू शकता. अशा काही व्यायाम प्रकारांची माहिती आपण घेणार आहोत.

असा करा व्यायाम

१ खुर्चीवर एकदम सरळ बसून पायाच्या जांघेवर हात ठेवा. मानेला मागच्या बाजूने करून छाती पसरवा. काही वेळ मानेला उजव्या आणि डाव्या बाजूला फिरवा. मानेला खाली करा आणि मोठा श्वास घेत सोडून द्या. असे ८ ते १० वेळेस करा.

२ उजव्या हाताची बोटे उजव्या आणि डाव्या हाताचे बोटे डाव्या खांद्यावर ठेवा. दोन्ही हातांच्या बोटांना अडकवून डोक्यावर ठेवा. आता हातांना लांब करत वरती उचला. श्वास घ्या आणि सोडा. थोडे उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला वाका. असे ८ ते १० वेळेस करा.

३ खुर्चीवर पूर्ण सरळ बसा. दोन्ही हातांना समोर पसरवा. नंतर दोन्ही हातांना सरळ ठेवत डोक्यावरती घेऊन जा. त्यानंतर हळू-हळू खाली आणा. ८ ते १० वेळेस असे करा. खाद्यांचा त्रास कमी होतो.

४ खुर्चीवर पूर्ण सरळ बसा. दोन्ही पायांना समोर पसरवा. खाली वाकून पायांच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. ३० सेकंद याच स्थितीत राहा. ५ ते ६ वेळेस असे करा. यामुळे कंबरेचा त्रास कमी होईल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु