जिममध्ये नुसता घाम गाळू नका, प्रथम जाणून घ्या कोणत्याही ‘व्यायामाची त्रिसुत्री’

जिममध्ये नुसता घाम गाळू नका, प्रथम जाणून घ्या कोणत्याही ‘व्यायामाची त्रिसुत्री’

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  फिट राहण्यासाठी अनेकजण जिममध्ये जाऊन घाम गाळतात. तर काहीजण सकाळी खुप धावतात, पायी चालतात. परंतु, यातून काय मिळवायचे हे आपल्याला नक्की माहिती असले पाहिजे. प्रत्येकाचे फिट राहण्यामागील ध्येय वेगळे असते. त्यामुळेच त्यासाठीचा वर्कआऊटही वेगळा असतो. परंतु, प्रत्येक व्यायाम प्रकाराची त्रिसुत्री लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला योग्य तो लाभ होऊ शकतो.

ही आहे त्रिसुत्री
व्यायाम करण्यामागील ध्येय कोणतेही असो, पण कोणत्याही व्यायामाचा पाया मात्र एका त्रिसूत्रीवर आधारलेला असतो. तो म्हणजे कार्डिओ, स्ट्रेंग्थ आणि फ्लेक्जिबिलिटी होय.

हे लक्षात ठेवा
१ तरुण मुलांना पिळदार शरीरासाठी मसल्स डेव्हलप करायचे असतात. बॉडीबिल्डर सारखे दिसावे असे त्यांचे ध्येय असते. तर महिलांचे ध्येय वेटलॉस आणि फिगर मेन्टेन ठेवण्याचे असते.

२ फिटनेसचे ध्येय कोणतेही असले तरी वरील त्रिसूत्रीकडे लक्ष द्यायलाच हवे.

३ महिलांनी, सतत एकच प्रकारचा वर्कआऊट मोनोटोनससाठी करू नये, कारण त्याचा फार फायदा होत नाही.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु