मुलांना लहानपणापासूनच लावा मैदानी खेळांची सवय, उत्तरार्धातही राहतील फिट

मुलांना लहानपणापासूनच लावा मैदानी खेळांची सवय, उत्तरार्धातही राहतील फिट

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – व्यायाम करण्यासाठी जिममध्येच गेले पाहिजे, हा गैरसमज आहे. कुठलाही मैदानी खेळ किंवा जॉगिंग, रनिंग यामुळेही शरीराचा चांगला व्यायाम होतो. लहानपणी असा व्यायाम केल्यास आयुष्याच्या उत्तरार्धातही तो फायदेशीर ठरतो. लहानपणी व्यायाम केलेला असल्यास शरीराला, हाडांना सवय झालेली असते. ती बळकट होतात. यासाठी पालकांनी मुलांसोबत व्यायामाला, खेळायला, फिरायला गेले पाहिजे.

हे आहेत फायदे

१) नंतरच्या आयुष्यात व्यायाम सोडला, जीवनशैली बिघडली, तरी त्याचा जास्त निगेटिव्ह परिणाम शरीरावर होत नाही.

२) हाडे मोडण्याचे प्रमाण कमी होते.

३) चयापचय क्रिया तुलनेने चांगली राहते.

४) लठ्ठपणाचे प्रमाण कमी राहाते.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु