सावधान ! वर्कआउटनंतर कधीही करु नका ‘या’ 4 गोष्टी, जाणून घ्या

सावधान ! वर्कआउटनंतर कधीही करु नका ‘या’ 4 गोष्टी, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम –  वजन कमी करणे तसेच बॉडी बनविण्यासाठी अनेक जण जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. परंतु, जिममध्ये वर्कआउट केल्यानंतर हे लोक अनेक चुका करतात. यामुळे सर्व मेहनत वाया जाते. वर्कआउटचा योग्य तो फायदा मिळवण्यासाठी काही चुका नेहमी टाळल्या पाहिजेत. वर्कआउटनंतर कोणत्या चुका करु नये, याची माहिती आपण घेणार आहोत.

या चुका करू नका

१) वजन वाढते म्हणून गोड खाणे बंद करु नका. कारण शरीराला जशी पोषक पदार्थांची आवश्यकता असते तशीच शरीराची कार्यप्रणाली सुरळीत राहण्यासाठी फॅटदेखील आवश्यक असते. यासाठी आहारात गोड पदार्थांचाही समावेश करा.

२) जेवणाचे प्रमाण कमी करू नका. तसेच बॉडी बनविण्यासाठी अतिप्रमाणातही आहार घेऊ नका. या दोन्ही सवयी चुकीच्या आहेत.

३) वर्कआउटनंतर वेळेवर आणि हेल्दी खाणे खा. पोष्टिक आहार घ्या. सकाळचा महत्त्वपूर्ण आहे. जिममधून आल्यानंतर प्रोटीन शेकचे सेवन करा. तसेच अंडे, फळ आणि हिरवा भाजीपाला खा.

४) जिममूधन आल्यानंतर खुप वेळापर्यंत उपाशी राहू नका. यामुळे शरीराचे नुकसान होते. व्यायामनंतर शरीरात काही पोषकतत्त्वांची कमतरता निर्माण होते. ती पूर्ण करण्यासाठी पोषक पदार्थांचे सेवन करा.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु