‘बॉडी बिल्डिंग’ बाबत आहेत ‘हे’ गैरसमज, जाणून घ्या सत्य

‘बॉडी बिल्डिंग’ बाबत आहेत ‘हे’ गैरसमज, जाणून घ्या सत्य

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बॉडी बनविण्यासाठी अनेकजण जिम जॉइन करतात. तसेच सप्लीमेंटदेखील घेतात. यामुळे कमी वेळेत चांगली बॉडी होऊ शकते, असा त्यांचा समज असतो. बॉडी बनविण्यासदंर्भात असे अनेक गैरसमज असून तेच सत्य मानले जातात. याविषयी नेमके सत्य काय आहे, ते आपण जाणून घेणार आहोत.

हे आहे सत्य

१) दिवसातून हजार सिट अप्स आवश्यक असल्याचा एक गैरसमज आहे. परंतु, फक्त सिट अप करणे आवश्यक नाही. ऐब्डॉमनल मसल्स बनविण्यासाठी पूर्ण मेहनत घेऊनही रिझल्ट मिळत नसल्यास समस्या फॅट परसेंटेजची आहे. अशावेळी डायटवर लक्ष द्यावे.

२) रोज वेट लिफ्टिंग आवश्यक असल्याचे काहीजण म्हणतात. परंतु, रोजच वेट लिफ्टिंग करणे प्रत्येकाच्या शरीरासाठी चांगले नसते. याने मसल्सवर विपरित परिणाम होऊ शकतो. आठवड्यातून २ – ३ दिवसच वेट लिफ्टिंग करावी. याव्यतिरिक्त उर्वरित दिवस व्यायाम आणि योगा करावा.

३) सप्लीमेंट आहाराने बॉडी बनते हा एक गैरसमज आहे. याने आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. नेहमी नॅच्युरल प्रोटीन घ्यावे. व्यायाम करा. याने बॉडीदेखील बनेल आणि आरोग्यही चांगले राहिल.

४) हेवी वेट लिफ्टिंगने लवकर मसल्स बनतात हा गैरसमज आहे. वेट लिफ्टिंग आवश्यक आहे मात्र आपल्या क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलणे शरीरासाठी घातक ठरू शकते. यासाठी ड्रॉप सेट, हाफ रॅप, स्लो रॅप, सुपर सेट आदीं करु शकता.

५) जिम ट्रेनरला संपूर्ण नॉलेज आहे, हा सुद्धा कधी-कधी गैरसमज ठरू शकतो. कारण काही लोक अ‍ॅब्स आणि चांगली बॉडी बनवूनदेखील जिम ट्रेनरची नोकरी मिळवतात.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु