पोटाची चरबी कमी करण्याचे ‘हे’ ८ उपाय, एकदा अवश्य करून पाहा

पोटाची चरबी कमी करण्याचे ‘हे’ ८ उपाय, एकदा अवश्य करून पाहा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चरबीमुळे शरीराचा आकार बिघडतो. यामुळे व्यक्तीमहत्वाची छाप पडत नाही. शिवाय, विविध आरोग्य समस्या निर्माण होतात. पोटाची चरबी कमी करण्यासाठी अनेक जण विविध प्रयत्न करत असतात. यामध्ये डाएट, व्यायाम असे प्रकार केले जातात. परंतु, त्यामध्ये सातत्य नसल्याने पुन्हा चरबी वाढते. काही उपाय अतिशय सोपे असून ते केल्यास या समस्येतून मुक्त होणे शक्य आहे.

हे उपाय करा

१) पाठीवर झोपून गुडघे ९० अंशावर करा. गुढघ्याच्यामध्ये बॉल ठेवून हळू-हळू श्वासोच्छवास करत पुढे येत पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. हा व्यायाम १५ मिनिट करा.

२) शरीरात साखरेचा स्तर वाढल्यास मधुमेह आजार होण्याची शक्यता राहते. यामुळे साखरेचे प्रमाण कमी करा.

३) मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट फुगते. जास्त स्पायसी फूड, स्नॅक्स यामध्ये मीठ जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे वजन कमी होत नाही.

४) डायट प्लान तयार करताना त्यामध्ये प्रोटीन आणि भरपूर पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. या व्यतिरिक्त चांगल्या प्रमाणात कार्बोहायड्रेटचे सेवन करावे.

५) अन्न चावून-चावून खाल्ल्याने ते सहजपणे पचते आणि पोटाच्या जवळपास अतिरिक्त चरबी जमा होत नाही. यामुळे अन्न शांतपणे आणि ३२-३६ वेळेस चावून खावे.

६) हसत रहा. जास्त हसल्याने अ‍ॅब्सचे मसल्स मजबूत होतील.

७) योग्य झोप आणि तणावापासून दूर राहील्यास वजन कमी होते.

८) तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. ध्यान, योगाच्या माध्यमातून तणावाला दूर ठेवणे शक्य आहे.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु