तरुणांमध्ये येत आहे ‘अकाली वृद्धत्व’ ; जाणून घ्या कारणे

तरुणांमध्ये  येत आहे ‘अकाली वृद्धत्व’ ; जाणून घ्या कारणे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जीवनशैली बदलल्याने वृद्धपकाळात होणारे अनेक आजार तरूणांना जडत असल्याचे अलिकडे दिसून येत आहे. ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. स्मरणशक्तीचा अभाव, एखादी गोष्ट लवकर विसरणे, हृदयविकार, नैराश्य, पार्किन्सन हे सर्वसाधारणपणे वृद्धापकाळात होतात. परंतु, हे आजार ऐन तारूण्यात असणारांनाही होऊ लागले आहेत. वाढत्या स्पर्धेमुळे आहार, झोप आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत. जगभरात ही समस्या भेडसावत आहे.

संशोधकांनी केलेल्या विविध प्रयोगांतून आधुनिक जीवनशैली आणि त्याच्या परिणामांमुळे तरुण पिढी अकाली प्रौढ होत असल्याचे दिसून आले आहे. यासाठी जीवनशैलीत काही आरोग्यदायी बदल केल्यास तरूण पणात होणारे हे आजार टाळता येणे शक्य आहे.
तरूणांची स्मरणशक्ती कमी होण्याचे मुख्य कारण तणाव आणि अनेक कामांचे ओझे हे आहे. तरुण पिढीचा बहुतांश वेळ संगणकासमोर टायपिंग करण्यात जातो. यामुळे युवकांमध्ये लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होत आहे.

याचा परिणाम त्यांच्या लक्षात ठेवण्याच्या क्षमतेवर होतो. परिणामी त्यांना अनेक गोष्टी आठवत नाही असा दावा या संशोधकांनी केला आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने ही समस्या वाढत आहे. ही समस्या टाळण्यासाठी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच संशोधकांचे म्हणणे आहे की, तरुणांमधील वाढता तणाव आणि दारूचे व्यसन हृदयाला अशक्त बनवते. दारूच्या व्यसनाचा परिणाम हृदयातील रक्त पुरवठा नियंत्रणात ठेवणाऱ्या पेशींवर पडतो. व्यसनासोबत जास्त तणाव त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकतो. तणाव घेतल्याने फक्त हृदयगती वाढत नाही तर हायपरटेन्शनचा त्रास होऊ लागतो. अशाने हृदयविकार आणि हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता वाढते.

युवा पिढीत मधुमेह वेगाने वाढत आहे. चूकीच्या जीवनशैलीमुळे जगभरातील युवक टाइप टू मधुमेहाचे बळी ठरत आहेत. याची लक्षणे २० ते ३० वर्षे वय असताना दिसू लागतात. पार्किन्सन म्हजणेच कंपवात हा आजार तरुणपणीच अनेकांना होत आहे, असे संशोधकांना आढळून आले आहे. एका नऊ वर्षांच्या मुलाला पार्किन्सन झाल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी घडला आहे. हा वयाच्या ६० व्या वर्षांनंतर होणारा आजार आहे.

तसेच थॉयरॉइड हा तरुणांना होणारा एक प्रमुख आजार आहे. कमी वयातच हायपोथायरॉइडचे लक्षण दिसू लागतात हे अनेक संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे. पुरेशी झोप न झाल्याने मेंदूचा स्मरण करणारा महत्त्वाचा ठरणारा काही भाग प्रभावित होतो. त्यामुळे तरूणांना स्मरणशक्ती कमी होण्याचा त्रास होत आहे. हायपोथायरॉइडिज्म सारख्या थायरॉइड आजारामुळे कमी वयात स्मृतीत घट होऊ लागते. पोषक आणि संतुलित आहाराचा अभाव असल्यास त्याचा स्मरणशक्तीवर परिणाम होतो. व्हिटामीन बी १ ची कमतरता असल्यास स्मरणशक्ती जास्त कमकुवत होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु