काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत

काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत

आरोग्यनामा ऑनलाइन – काकडी मधुर, शितल, पाचक, मुत्रगामी आणि अग्निदिपक तसेच पित्तहारक व थंड आहे. काकडीच्या सेवनाने विविध प्रकारचे मुत्रविकार दूर होतात. काकडी उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी, तहान भागविण्यासाठी उपयुक्त आहे. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. याच्या सेवनामूळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जाते. व्हिटॅमिन ए, बी आणि सी चे प्रमाण जास्त् असल्याने त्वचेसाठी चांगली असते.

हे आहेत फायदे

* मासिक पाळीमध्ये खूप त्रास होत असल्यास दह्यामध्ये काकडीचे बारीक तुकडे करून त्यामध्ये पुदिना, काळे मीठ, जिरे आणि हिंग टाकून रायता बनवून खावे.

* काकडीचा रस काढून चेहरा, हात, पायावर याचा लेप लावल्यास त्वचा कोमल होते. काकडीच्या रसामध्ये थोडी साखर मिसळून हा रस पिल्यास लघवी साफ होते.

* काकडीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असल्याने हाडे मजबूत होतात.

* काकडीचे नियमित सेवन केल्यास वजन कमी होते.

* काकडीमध्ये साइकोसोलएरीक्रिस्नोल, लॅरीक्रिस्नोल आणि पायनोरिस्नोल हे तत्व असतात. हे तत्व सर्व प्रकारच्या कँसरला आळा घालण्यात सक्षम आहेत.

* शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे डायबिटीज नियंत्रणात राहतो.

* काकडीचे स्लाईस करून डोळ्यावर ठेवा. यामुळे डोळ्याखाली झालेले डार्क सर्कल नष्ट होतील.

* पोटाचा आजार असलेल्या लोकांनी दररोज काकडीचे खावी. पोटाचे आजार दूर होतात.

आरोग्यविषयक वृत्त

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु