अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पालेभाज्या आणि फळभाज्या नियमित खाण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देतात. या भाज्यांमधून आपल्या शरीराला विविध प्रकारचे पोषक घटक मिळत असतात. शिवाय वेगवेगळ्या आजारांत भाजी तयार करण्याच्या पद्धतीत काही बदल केल्यास ते लाभदायक ठरू शकते. आरोग्यविषयक समस्येनुसार भाज्यांचा आहार घेणे फायद्याचे ठरते. भाज्यांचे सेवन कोणकोणत्या पद्धतीने करता येऊ शकते याबाबत आपण माहिती घेणार आहोत.

कच्या भाज्यापासून तयार केलेल्या सॅलडमूधन भरपूर व्हिटामिन मिळतात. यातून सर्व एंजाइम्स आणि वॉटर सोल्युबल व्हिटामिन्स जास्त प्रमाणात मिळतात. भाज्या शिजवल्याने त्यातील पौष्टिक तत्त्वे नष्ट होतात आणि त्याचा फायदा मिळत नाही. मूतखड्याची समस्या असल्यास पाण्यात उकडलेल्या भाज्या खाव्यात. भाज्यांमधील ऑक्सेलिक अँसिड या सेंद्रिय घटकाचे प्रमाण जास्त असल्यामुळे पुन्हा मूतखड्याचा धोका वाढतो. अशावेळी पालक, बीट किंवा इतर लोहयुक्त भाज्या उकडून खाव्यात.

त्यामुळे ऑक्सेलेट पानी बाहेर जाते. भाज्या आगीवर भाजणे हा एक चांगला पर्याय असून तो ग्रिलिंगपेक्षा जास्त पोषकआहे. ग्रिलिंगमुळे विषारी घटकांची निर्मिती होते. ज्या पदार्थांमध्ये प्रोटीन आणि शुगर जास्त असते ते पदार्थ ग्रील करून खाल्यास हानीकारक ठरतात. तसेच इरिटेबल बाऊल सिंड्रोम म्हणजे पचन प्रणालीसंबंधित समस्या झाल्यावर स्टीम्ड म्हणजेच वाफेवर तयार केलेल्या भाज्या खाव्यात. यामुळे भाज्या सहज पचतात. तसेच भाज्यांमधील अँटिऑक्सिडेंट्सचे नुकसान होत नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु