सकाळी लवकर उठणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी ?

सकाळी लवकर उठणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी ?

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सूर्योदयापूर्वी उठून सर्व दैंनदिन कामे उरकावीत, असे नेहमीच सांगितले जाते. यामुळे आरोग्य चांगले राहते. प्राचीन ग्रंथांमधूनही हाच सल्ला देण्यात आला आहे. आता वैद्यक शास्त्रातूनही या गोष्टीला पुष्टी मिळत आहे. संशोधकांनी केलेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, सकाळी लवकर उठणाऱ्या १०० पैकी एका महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. या तुलनेत सकाळी उशिरा उठणाऱ्या १०० पैकी २ महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असते. सकाळी उठण्याचा एवढा फरक आरोग्यावर दिसून येत असल्याचेच या संशोधनात आढळले आहे.

म्हणूनच रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावे. या सवयीमुळे आरोग्य चांगले राहेत असे आपल्याला वारंवार सांगितले जाते. सकाळी उशिरा उठणाऱ्या महिलांच्या तुलनेत सकाळी लवकर उठणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण कमी आहे, असल्याचे आढळून आल्याने सकाळी लवकर उठण्याचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. हे संशोधन करण्यासाठी संशोधकांनी महिलांचे २ गट केले होते. एका गटातील महिलांना त्यांच्या उठण्याच्या वेळेबाबत विचारण्यात आले. या गटात १,८०,००० महिलांचा समावेश होता. तर दुसऱ्या गटातील महिलांची डीएनए तपासणी करण्यात आली.

यात २,२०,००० महिलांचा समावेश होता. डीएनए चाचणीवरून ज्या महिला सकाळी लवकर उठत असल्याचे आढळले, त्यांचा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका ४८ टक्क्यांनी कमी होता. तर ज्या महिलांनी आपण सकाळी लवकर उठत नसल्याचे सांगितले त्यांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका ४० टक्क्यांनी कमी होता. तसेच ज्या महिलांनी ७ ते ८ तासांपेक्षा जास्त झोपत असल्याचे सांगितले, त्यांचा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका प्रत्येकी एक तासामागे २० टक्क्यांनी वाढत होता. सकाळी लवकर उठणाऱ्या १०० पैकी १ महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो, तर सकाळी उशिरा उठणाऱ्या १०० पैकी २ महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. झोपण्याच्या वेळा आणि ब्रेस्ट कॅन्सरचा संबंध असल्याचे संशोधकांना आढळून आले.

ब्रेस्ट कॅन्सर होण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असून त्या कारणांचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला नाही. हा अभ्यास व्यापक स्तरावर करण्यात आला नाही. त्यामुळे झोप ही ब्रेस्ट कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरू शकते, एवढाच निष्कर्ष यातून समोर आला आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु