महिलांनो, अकाली हृदयविकाराचा झटक्याचा धोका वाढतोय! ‘ही’ आहेत ४ कारणे

 
महिलांनो, अकाली हृदयविकाराचा झटक्याचा धोका वाढतोय! ‘ही’ आहेत ४ कारणे

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू होण्याच्या घटना अलिकडे वारंवार घडू लागल्या आहेत. हे प्रमाण खुपच जास्त आहे. हृदयविकाराच्या झटक्याने महिलांचा मृत्यू होण्याचे प्रमाण खुपच कमी असल्याचे यापूर्वी म्हटले जात होते. महिलांच्या तुलनेत पन्नाशीच्या पुढील पुरुष मंडळींमध्ये हृदयविकाराचा झटका ही सामान्य बाब होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हा ट्रेंड बदलला आहे का, अशी शंका येऊ लागली आहे.

ही आहेत कारणे
इस्ट्रोजन हार्मोन्स
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण कमी असण्याचे कारण म्हणजे महिलांमधील इस्ट्रोजन हार्मोन्स हे आहे. हे हार्मोन्स मासिक पाळी येणे बंद झाल्यानंतर हळूहळू कमी होतात. पण सध्या मासिक पाळी सुरू होण्याचे वय ७ ते ८ वर्षांवर आल आहे. मेनोपॉज साधारण चाळीशीत येतो. याचा अर्थ कमी वयातच इस्ट्रोजनचे प्रमाण कमी होते.

जबाबदारी
स्त्रियांवर घरची जबाबदारी अधिकच असते. त्यातच आर्थिक आणि सामाजिक जबाबदारी वाढली.

३ व्यसन, ताणतणाव
ताणतणाव, डिप्रेशन, कोलेस्टेरॉलसह सिगारेट, अल्कोहोलच्या व्यसनाचे प्रमाणही वाढले आहे.

४ व्यायामाचा अभाव 
व्यायाम, अ‍ॅरोबिक्सकडे दुर्लक्ष. प्रेग्नन्सी, बाळंतपणामुळे वाढलेले फॅट्स यामुळे आटोक्यात येत नाही.

५ वाईट सवयी
पुरूषांच्या वाईटजीवनशैलीतील वाईट गोष्टीही स्त्रियांनी स्वीकारलेल्या दिसतात.

ही आहेत लक्षणे
१ अचानक चक्कर येणे.
२ छातीत धडधडणे.
३ घाम फुटणे.
४ घशात अडकल्यासारखे वाटणे.

हे लक्षात ठेवा
* वरील लक्षणे आढल्यास त्वरित हॉस्पिटल गाठा.
* कामाला महत्त्व देऊन या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु