महिलांनी ‘या’ हार्मोनल असंतुलनाच्या संकेताकडे करु नये दुर्लंक्ष, अन्यथा होतील दुष्परिणाम

महिलांनी ‘या’ हार्मोनल असंतुलनाच्या संकेताकडे करु नये दुर्लंक्ष, अन्यथा होतील दुष्परिणाम

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीरात हार्मोन्स नियंत्रित राहणे गरजेचे असते. अन्यथा शारीरिक क्रियांवर परिणाम होतो. अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हार्मोन्स असंतुलन एक सायलेंट किलर असून यामुळे महिलांचा स्वभाव चिडचिडा होतो. चाळीस ते पन्नास पेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये ही समस्या दिसून येते. बदललेल्या जीवनशैलीमुळे वीस ते तीस या वयाच्या महिलांमध्येही ही समस्या आढळून येत आहे. हार्मोनल असंतुलनाचे संकेत कसे ओळखावेत याविषयी जाणून घेवूयात.

हे आहेत संकेत

इंटरकोर्समध्ये रुचि नसणे
हार्मोन्स असंतुलनामुळे वैवाहिक जीवनावर वाईट प्रभाव पडतो. यामुळे सेक्सची इच्छा नष्ट होते.

स्मरणशक्ती
वारंवार लहान-लहान गोष्टींचे विस्मरण होते. हार्मोन्स असंतुलित असल्याने हे होते.

झोप, थकवा
विनाकारण थकवा येत असेल तर हा हार्मोन्स असंतुलनामुळे होऊ शकते. प्रोजेस्टेरॉन जास्त झाल्यामुळे असे होते.

जास्त घाम
हार्मोन्स शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवतात. हार्मोन्स बिघडले तर बॉडी टेम्परेचर बदलते. रात्री अचानक गरम होते. घाम येतो.

वजन वाढणे
वजन जलद वाढते. नियंत्रित होत नाही. पचनक्रिया बिघडते. शरीराची चरबी नष्ट करण्याची क्षमता कमी होते.

तणाव, चिंता
सतत मूड खराब राहणे, सतत तणावग्रस्त राहणे हा हार्मोन्स असंतुलित असण्याचा संकेत असू शकतो. यामुळे स्वभावात बदल होतात.

जास्त भूक लागणे
गरजेपेक्षा जास्त भूक लागते. जास्त खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो.

नको असलेले केस
चेहरा किंवा शरीराच्या इतर भागांवर केस येणे हार्मोनल असंतुलनाचा संकेत असू शकतो.

अनियमित पीरियड्स
पीरियड्स वेळेवर येत नसतील तर हार्मोन्स असंतुलित असण्याची शक्यता असते.

पिंपल्स
महिलांना जॉ-लाइन भागावर वारंवार पिंपल्स येत असतील. ते ठिक होत नसतील तर हार्मोन्स असंतुलनचा संकेत असू शकतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु