लक्ष केंद्रित का होत नाही ? जाणून घ्या यामागील कारणे

लक्ष केंद्रित का होत नाही ? जाणून घ्या यामागील कारणे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित न होण्याच्या समस्येची अनेक कारणे असतात. अशा प्रकारचा त्रास होऊ लागल्यास आपल्या कामावर त्याचा वाईट परिणाम दिसून येतो. शिवाय, मानसिक ताणतणाव वाढू लागतो. यामुळे कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित होणे खूप गरजेचे असते.  चूकीच्या आहारामुळे लठ्ठपणा, हायपरटेंशन आणि कोलेस्टेरॉल वाढणे अशा समस्या होतात. यामुळे व्यक्तीची कार्यप्रणालीची पातळी खालावते. हृदयाची कार्यप्रणाली चांगली असल्यास शरीरात चांगल्या प्रकारे रक्तप्रवाह होत राहतो. जो काँगनिटिव्ह प्रणाली सुधारण्यासाठी महत्त्वाचा असतो. ही समस्या दूर करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या आणि मासे भरपूर प्रमाणात खावेत.

इतर आरोग्यविषयक समस्येवर काही औषधे सुरू असल्यास या औषधांमुळेसुद्धा एकाग्रता कमी होते. अँटीडिप्रेसेंटसारख्या औषधाचे सेवन केल्याने मूड खराब होतो. तसेच लक्ष विचलित होण्याचा त्रास होतो. अँटी एंजाइटी औषधांमुळे आळस येणे, बीटा ब्लॉकर्समुळे कामात मन न लागणे असे साइड इफेक्ट होतात. जर औषधामुळे अशी समस्या होत असल्यास डॉक्टरांकडे जावे. डॉक्टर दुसरी औषधे देऊ शकतात.

तसेच मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीवेळी महिलांच्या शरीरात हार्मोन्समध्ये बदल होत असतात. अनियमित मासिक पाळीच्या वेळी अँस्ट्रोजन हार्मोनचा स्तर अचानक कमी होतो. परिणामी एकाग्रता कमी होते. अशावेळी डोके दुखणे आणि चक्कर येण्याचा त्रास होतो. अशावेळी महिलांना हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

नवा जॉब तसेच रिलेशनशिपमुळे सुद्धा लक्ष केंद्रित होण्यात अडचण येते. म्हणजेच तुम्ही अटेंशन डिफिसाइट हायपरअ‍ॅक्टिव्ह डिसऑर्डरने पीडित असू शकता. ही समस्या लहानपणी होते. पण वेळीच उपाय न केल्यास युवावस्थेत याचा वाईट परिणाम होतो. यामुळे पीडित व्यक्तीतील धाडस कमी होते. विसरण्याची सवय जडते. कोणत्याही कामावर लक्ष देता येत नाही. यासाठी स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे जाऊन उपचार करावेत.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु