लग्नापूर्वी वर-वधूला का लावली जाते हळद ? जाणून घ्या

लग्नापूर्वी वर-वधूला का लावली जाते हळद ? जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन – हिंदू धर्मात मनुष्य जीवनासाठी १६ महत्त्वपूर्ण संस्कार आहेत. यापैकीच एक लग्न हा संस्कार आहे. लग्नाच्या विविध प्रथा आणि परंपरा असून त्याचे पालन आजही होते. काही प्रथा वर-वधू दोघांसाठी एकसारख्याच असतात. यापैकी एक प्रथा म्हणजे वर-वधूला हळद लावणे, ही होय. लग्नापूर्वी वर-वधूला हळद का लावली जाते? यामागील कारणे जाणून घेवूयात.

ही आहेत कारणे

हळद नॅचरल स्ट्रेस बस्टर आहे. लग्नापूर्वी मुलगा आणि मुलगी यांच्या मगात अनेक विचार सुरू असतात. हळदीमुळे स्ट्रेस कमी होतो.

लग्नापूर्वी चेहरा स्वच्छ होतो.

प्राचीनकाळी हळद लावणे हीच ब्युटीट्रीटमेंट होती.

हळदीत अँटीसेप्टीक गुण असतात. वर-वधुला निरोगी त्वचा प्राप्त व्हावी, यासाठी हळद लावली जाते.

भारतीय परंपरेनुसार हळद लावणे शुभ मानले जाते.

हळदीतील तत्व त्वचा उजळ करतात. चमक वाढते.

त्वचा समस्या आणि आजार दूर होतात.

आरोग्यविषयक वृत्त

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु