कांदा कापताना का येतात अश्रू ? ‘या’ १२ सोप्या पद्धतींनी टाळता येईल ‘ही’ समस्या

कांदा कापताना का येतात अश्रू ? ‘या’ १२ सोप्या पद्धतींनी टाळता येईल ‘ही’ समस्या
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कांदा कापताना डोळे झोंबतात आणि अश्रू येतात, हा अनुभव सर्वांनाच येतो. कांद्यातील पातळ लेयरमध्ये अमीनो अ‍ॅसिड अल्फोक्साइड्स असतात. कांदा कापताना सल्फर गॅस होतो. हा गॅस डोळ्यांपर्यंत पोहचताच, डोळे झोंबतात आणि अश्रू येतात. कांदा कापताना डोळ्यातून अश्रू येऊ नये यासाठी काही सोप्या पद्धती आहेत.

हे उपाय करा

कांदा कापताना जवळच मेणबत्ती लावा. कांद्यातून निघणारा गॅस डोळ्यांना त्रास देणार नाही.

कांदा कापताना शिटी वाजवा. याच्या एयरफ्लोमुळे कांद्याचा गॅस डोळ्यांना त्रासदायक ठरणार नाही.

कांदा कापण्यापूर्वी थोडावेळ फ्रिजरमध्ये ठेवा. यानंतर कापा. डोळ्यातून अश्रू निघणार नाही.

कांदा नेहमी धारधार सुरीने कापा. यामुळे डोळ्यांना झोंबण्यासाठी कारणीभूत एंजाइन्स कमी प्रमाणात रिलिज होतील.

प्रथम कांद्याचे दोन भाग करून पाण्यात टाका. आता कांदा पाण्यात ठेवूनच कापा.

कांदा कापताना दोन ते तीन वेळा सुरीवर लिंबाचा रस लावा.

बोर्डवर थोडे व्हाइट व्हिनेगर लावा. नंतर कांदा कापा.

चाकू थोला ओला करून त्याव मीठ लावून नंतर कांदा कापा.

कांदा कापताना एक ब्रेडचा तुकडा हळुहळु चावा.

१०
तोंडाने श्वास घ्या आणि जीभ थोडी बाहेर ठेवा. यामुळे कांद्यातील गॅस प्रथम जिभेच्या संपर्कात येईल.

११
खिडकी उघडून अथवा फॅन सुरू करून कांदा कापा.

१२
कांदा कापण्याची सुरूवात कधीही कांद्याची मुळं असलेल्या भागाकडून करू नका. कारण गॅस येथून रिलिज होत असतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु