दारू पिल्‍यावर अनेक जण इंग्रजीत का बोलतात ? जाणून घ्या ‘या’ प्रश्नाचे उत्तर

दारू पिल्‍यावर अनेक जण इंग्रजीत का बोलतात ? जाणून घ्या ‘या’ प्रश्नाचे उत्तर

आरोग्यानामा ऑनलाइन – दारू प्यायल्यानंतर अनेकजण इंग्रजी बोलू लागतात. तर काही जण हिंदी सुरू करतात. हे दृश्य खुपवेळी तुम्ही सुद्धा पाहिले असेल, अथवा अनुभवले सुद्धा असेल. काही जण यास दारूच्या नशेत बरळणे, असे देखील म्हणतात. इंग्रजीचा फार गंध नसलेले दारू पिल्‍यानंतर इंग्रजी कसे बोलू लागतात, याविषयी करण्यात आलेल्या एका संशोधनाबाबत आपण जाणून घेणार आहोत.

असे केले संशोधन

1 संशोधकांनी एका संशोधनाद्वारे या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हे संशोधन सायकोफर्माकोलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनानुसार थोडीशी दारू प्यायल्यावर नवी भाषा बोलण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. शास्त्रज्ञांनी यासाठी कॉलेजच्या पन्नास विद्यार्थ्यांचे परीक्षण केले.
2 पन्नास विद्यार्थ्यांपैकी काही जणांना दारू पाजण्यात आली, तर काहींना साधे पाणी दिले. ठरल्याप्रमाणे त्यांना एका व्यक्तीसोबत २ मिनिटे परकीय भाषेत बोलायचे होते. यासाठी दोन भाषातज्ज्ञांना बोलावले होते. त्यांना कोण दारू प्यायले आहे आणि कोण नाही, हे सांगण्यात आले होते.
3 यावेळी ज्यांनी फक्त पाणी पिऊन संवाद साधला, त्यांच्या बोलण्यात कोणताही फरक आढळला नाही. परंतु ज्यांनी थोडीशी दारू प्यायली होती त्यांचे उच्चार आणि फ्ल्यूएन्सी पाणी पिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत चांगली होती. दारू पिणाऱ्यांनी परकीय भाषेत अचूक संवाद साधल्याचे आढळून आले.
4 हा प्रयोग इतरही काही भाषांमध्ये करण्यात आला. यामध्ये एखादा इंग्रजीचा गंध नसणारा, थोडीशी दारू प्यायल्यानंतरही सफाईदारपणे इंग्रजी बोलत असल्याचे दिसून आले. मात्र, या संशोधकांनी हेदेखील सांगितले की, दारू पिण्याचा उलट परिणाम सुद्धा होऊ शकतो. दारू प्यायल्याने जिभेवर नियंत्रण राहत नाही, बोलताना माणूस अडखळतो. अस्खलित बोलणे अवघड होते. आत्मविश्वासही कमी होऊ शकतो. परफॉर्मन्सवरही परिणाम होऊ शकतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु