‘बॉडी इमेज डिसऑर्डर’ का होते ; जाणून घ्या कारणे

‘बॉडी इमेज डिसऑर्डर’ का होते ; जाणून घ्या कारणे

पोलिसनामा ऑनलाईन टीम- आपल्याकडे चित्रपटातील हिरोंसारखी बॉडी बनविण्यासाठी असंख्य तरूण जीम जॉइन करतात. अनेक तरूण असे आहेत की ते आपला जास्तीत जास्त वेळ जीममध्ये घालवतात. या बॉडी बनविण्याच्या वेडापायी अनेक तरूण सतत तणावात सुद्धा असतात, असे एका संशोधनात आढळून आले आहे. बॉडी इमेज डिसऑर्डर हा एक प्रकारे इतरांच्या तुलनेत आपल्या शरीरात कमतरता असल्याची भावना ठेवण्याचा एक मानसिक आजार आहे.

पुन्हा पुन्हा आपले शरीर आरशात बघणे आणि ते चांगले करण्यासाठी अधिक मेहनत घेणे या सोबतच कॉस्मेटिक पदार्थांचे सेवन करणे याचाही यामध्ये समावेश आहे.नॉर्वेगन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्समध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार, बॉडी बनवण्याच्या तणावात तरूण अनाबोलिक स्टेरॉइड आणि सप्लिमेंट्सचे सेवनही मोठ्याप्रमाणात करतात. सप्लिमेंट्स घेतल्याने शरीरावर अनेकप्रकारचे नकारात्मक प्रभावही पडतात. याबाबत संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.

यामध्ये असे आढळून आले की, १० टक्के तरूण, पुरूषांमध्ये शरीराबाबत गैरसमज असतात. काही पुरूष उगाचच स्वत:ला जास्त लठ्ठ समजू लागतात. यासाठी वजन कमी करणे आणि फिट राहण्यासाठी मेहनत घेताना तणावही ओढावून घेतात. संशोधनात सहभागी तरूणांनी त्यांच्या शरीरासाठी गेल्या तीन वर्षांपासून केलेले डाएट हे लठ्ठपणाशी संबंधित नव्हेत. अभ्यासकांनुसार, जास्तीत जास्त तरूण हे बॉडी इमेज डिसऑर्डरने ग्रस्त असल्याचे आढळले. बदलती जीवनशैली, समस्या, आव्हाने यामुळे जास्तीत जास्त तरूणांमध्ये शरीराबाबत अनेक प्रकारचे भ्रम तयार झाले आहेत. तरूण त्यांच्या फिटनेसबाबत संतुष्ट नाहीत. धक्कादायक म्हणजे सुशिक्षित लोकही या डिसऑर्डरने ग्रस्त आहेत.

बॉडी इमेज डिसऑर्डर समस्येमुळे अनेकजण फार सोशलही होत नाहीत. यामुळे ते तणाव आणि डिप्रेशनचे शिकार होऊ शकतात. तुलना आणि डाएटमध्ये बदल यामुळे शरीरात अनेकप्रकारचे बदल होतात. यामुळे डिप्रेशनची गंभीर समस्या होऊ शकते. जिमला जाणे किंवा बॉडी बनवणे यात कोणत्याही प्रकारची तुलना करू नये. जर तुमच्यातही याप्रकारची भावना असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा. जे याचे शिकार झाले आहेत, त्यांना काउन्सिलकडे जावे. डिप्रेशन आणि तणाव जाणावत असले तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु