अंघोळ करताना तुम्ही ‘या’ चूका तर करत नाही ना ?

अंघोळ करताना तुम्ही ‘या’ चूका तर करत नाही ना ?

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण आंघोळ करतो. बाथरूम मध्ये आंघोळ करताना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या सवयी असतात. या सवयी चांगल्या अथवा वाईट हे आपल्याला माहित नसते. आपण ती कृती करत असतो. परंतु , अनेकदा चुकीच्या पद्धतीने आंघोळ केल्यास त्याचे दुष्परिणाम दिसू शकतात. बाथरूममध्ये केल्या जाणाऱ्या चुकांविषयी आपण येथे माहिती घेणार आहोत.

अंघोळ करताना शॉवरच्या प्रेशरमध्ये चेहरा स्वच्छ करू नये. शॉवर मधून प्रेशरने येणाऱ्या पाण्यामुळे चेहऱ्याच्या चांगल्या त्वचेला आणि डोळ्यांना नुकसान होऊ शकते. खूप थंड किंवा गरम पाण्याने अंघोळ करू नये. केस आणि त्वचेचे टिश्यूज खराब होऊ शकतात. त्वचा जळू शकते किंवा तजेला जाऊ शकतो. जास्त वेळ शॉवर घेऊ नका. यामुळे त्वचेचे मॉइश्चर कमी होऊ शकते. त्वचा कोरडी पडून त्वचेवर सुरकुत्याही पडू शकतात. बॉडी स्क्रबर बाथरूममध्ये सोडणे चांगले नाही. ओल्या बॉडी स्क्रबरमध्ये हानिकारक बॅक्टेरिया निर्माण होतात. हे त्वचा आणि शरीरात संसर्ग निर्माण करू शकतात. खूप जास्त स्क्रब करू नये.

जास्त गोरे होण्यासाठी काही लोक जास्त स्क्रब करतात. यामुळे त्वचेच्या वरचा थर निघू शकतो. यामुळे संसर्ग होऊ शकतो. आंघोळीसाठी केमिकल असलेल्या साबणाचा वापर करू नये. मेडिकेटेड किंवा केमिकल असलेल्या साबणामुळे त्वचेचे संसर्गापासून रक्षण करणारे चांगले बॅक्टेरियाही नष्ट होतात. व्यायामानंतर लगेच शॉवर घेऊ नये. व्यायामामुळे शरीर गरम होते. तत्काळ थंड शॉवर घेतल्याने सर्दी-पडसे, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

टॉवेलने त्वचा जास्त घासून पुसू नये असे केल्याने त्वचा आणि केसांना नुकसान पोहोचू शकते. त्वचा कोरडी होऊ शकते आणि केस तुटू शकतात. शॉवरनंतर मॉइश्चरायझर लावले पाहिजे. शॉवर घेतल्यानंतर त्वचेचे मॉइश्चरायझर कमी होते. यामुळे तेल किंवा मॉइश्चरायझर लावावे. शाम्पूनंतर कंडिशनर लावले पाहिजे. अन्यथा केस ड्राय होऊ शकतात. केसांची चमक नष्ट होऊ शकते. केस गुंतून तुटू शकतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु