टरबूज आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी

टरबूज आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आइस्क्रीम खाण्याचा हट्ट लहान मुले नेहमी करतात. शिवाय, मोठ्यांनाही ते खाण्याची इच्छा नेहमीच होते. बाजारातील आइस्क्रिम शरीराला त्रासदायक ठरू शकते. त्याऐवजी घरातच तयार केलेली आइस्क्रिम शरीरासाठी जास्त हानिकारक नसते. टरबूजच्या खास आइस्क्रिमची रेसिपी जाणून घेवूयात.

अशी तयार करा टरबूज आइस्क्रिम

साहित्य

* ६ कप कापलेले टरबूज
* अर्धी ताजी क्रीम
* दीड कप दूध
* १ कप साखर
* १ कप पुदिन्याचे वाटलेली पाने

कापलेले टरबुज एका स्टेनरने पसरवा. यामुळे बिया निघून जातील. उरलेले पेस्ट एका बाउलमध्ये एकत्र करा. त्याच्यात क्रीम, दूध, साखर मिक्स करा. वाटलेले पुदिन्याचे पत्ते टाका. या मिश्रणाला काही तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवल्यावर ते सेट होईल.

 

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु