‘मायक्रोव्हेव’ वापरताय? लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, अन्यथा बिघडू शकते आरोग्य

‘मायक्रोव्हेव’ वापरताय? लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, अन्यथा बिघडू शकते आरोग्य

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भारतामध्ये सुद्धा अनेक घरांमध्ये मायक्रोव्हेवचा वापर मोठ्याप्रमाणात केला जातो. बटाटे उकडणे, केक बनविणे यासाठी मायक्रोव्हेवचा चांगला उपयोग होतो. मायक्रोव्हेवमध्ये कोणते पदार्थ बनवावेत आणि कोणते बनवू नयेत याची माहिती असणे गरजेचे आहे. कारण काही पदार्थ मायक्रोव्हेवमध्ये ठेवल्याने आरोग्याला नुकसान होऊ शकते. तसेच ओव्हन खराब होण्याची शक्यता असते. मायक्रोव्हेवमध्ये कोणते पदार्थ ठेवू नयेत, याची माहिती घेवूयात.

Image result for फ्रोजन मीट

फ्रोजन मीट
फ्रोजन मीट मायक्रोव्हेवमध्ये व्यवस्थित शिजत नाही. याचा वरील भाग शिजतो आणि आतील भाग हा कच्चा राहतो. यामध्ये बॅक्टेरिया असू शकतात. फ्रीजरमध्ये ठेवलेले मांस काही तास बाहेर काढून ठेवा आणि नंतर गरम करा.

Image result for अ‍ॅल्युमिनियम फॉइल
अ‍ॅल्युमिनियम फॉइल
मायक्रोव्हेव ओव्हनमध्ये अ‍ॅल्युमिनियम फॉइलमध्ये ठेवलेले अन्न गरम करु नका. यामुळे ते जळेल आणि ओव्हन खराब होऊ शकते. तसेच अ‍ॅल्युमिनियम जेवणात मिसळू शकते. जर हे शरीरात गेले तर टॉक्सिक होते. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

Image result for प्लास्टिक कंटेनर
प्लास्टिक कंटेनर
प्लास्टिक कंटेनर मायक्रोव्हेवमध्ये सुरक्षित नसतात. ज्या कंटेनरवर मायक्रोव्हेव सेफ लिहिले आहे त्यांचाच वापर करा. जास्त फॅट असणारे फूड प्लास्टिक कंटेनरमध्ये ठेवू नये.

Image result for पेपर लंच बॉक्स
पेपर लंच बॉक्स
पेपर लंच बॉक्स किंवा बॅग्स मायक्रोव्हेव ओव्हनमध्ये ठेवू नये. अशा प्रकारच्या बॅग्समध्ये इंक, ग्लू आणि रिसायकल्ड मटेरियल असतात. जे गरम केल्यावर टॉक्सिक फ्यूम निघतात. हे आरोग्यासाठी धोकादायक असते.

Image result for बोन प्लेट्स
बोन प्लेट्स
चायना किंवा मेटॅलिक प्लेट्स ओव्हनमध्ये ठेवू नये. हे ओव्हनमध्ये ठेवल्याने ओव्हन खराब होऊ शकतो.

‘मायक्रोव्हेव’ वापरताय? लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, अन्यथा बिघडू शकते आरोग्य
दूध
दूधाला मायक्रोव्हेवमध्ये गरम केल्याने यातील पौष्टीक नष्ट होतात. २०-१५ डिग्री से. तापमानावर सुध्दा दूध गरम करु नये.

‘मायक्रोव्हेव’ वापरताय? लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, अन्यथा बिघडू शकते आरोग्य
भाज्या
ओव्हनमध्ये भाज्या गरम करणे टाळावे. ब्रोकली तर ओव्हनमध्ये कधीच गरम करु नये.

Image result for पाणी
पाणी
पाणी मायक्रोव्हेव ओव्हनमध्ये गरम केल्याने वाफेमुळे ओव्हन खराब होईल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु