सकाळपासून संध्याकाळपर्यंत फ्रेश राहण्यासाठी अवश्य करा ‘हे’ ५ उपाय

सकाळपासून संध्याकाळपर्यंत फ्रेश राहण्यासाठी अवश्य करा ‘हे’ ५ उपाय
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कामाची ठिकाणी ताणतणाव ही नित्याचीच बाब असते. काहीवेळा कामाचे प्रेशर खूप मोठे असते. त्यातच स्पर्धा, मतभिन्नता यामुळेही मनस्ताप होतो. दिलेले काम, उद्दीष्ट्य पूर्ण होणार की नाही, याची सतत काळजी अनेकांना वाटत असते. यामुळे वरिष्ठ रागावण्याची भितीही असते. कामाच्या ठिकाणचा हा सर्व ताणतणाव कमी करण्यासाठी खास ५ उपाय असून त्याची माहिती आपण घेणार आहोत. हे उपाय केल्यास ताणतणाव कमी होईलच, शिवाय आरोग्यही चांगले राहिल.

छोटे-छोटे ब्रेक घ्या
परवानगी असल्यास कामाच्या ठिकाणी अधूनमधून छोटे-छोटे ब्रेक घ्या. यामुळे चांगले लक्ष्य केंद्रीत होते. शिवाय, थोडा आरामही मिळतो, असे कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात आढळून आले आहे.

संगीत ऐका
कामावर जाताना अथवा कामानिमित्त प्रवास करताना संगीत ऐका. सतत तणावात राहिल्याने प्रवासात उच्च रक्तादाबाचा त्रास होऊ शकतो. तसेच वजन वाढण्याचा धोका असतो.

संबंध चांगले ठेवा
घर आणि कार्यालय येथेच जास्त वेळ जात असतो. यासाठी कार्यालयातील सहकारी व्यक्तींशी चांगले संबंध ठेवा. चांगली आणि सकारात्मक वर्तणूक ठेवा. यामुळे आनंदी राहता येते व प्रकृतीही चांगली राहते.

पौष्टिक आहार
पौष्टिक आहार घेतल्यास मूड चांगला राहतो. चांगले निर्णय घेण्याची क्षमता वाढते. कामात सुधारणा होते. बदामासारखे अँटिऑक्सिडंट असलेले पदार्थ खा. यामुळे स्मरणशक्ती चांगली राहते.

पुरेशी झोप
चांगले काम करण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी नियमित व पुरेशी झोप आवश्यक असते. यामुळे जोमाने कामास प्रारंभ करता येतो. कामातही सुधारणा होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु