लिव्हरसाठी ‘हे’ पदार्थ धोकादायक

लिव्हरसाठी ‘हे’ पदार्थ धोकादायक

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – यकृत हे पचनसंस्थेमार्फत येणारे रक्त पूर्ण शरीरात जाण्याअगोदर शुद्ध करते. याच प्रक्रियेत यकृत हे शरीरामध्ये येणाऱ्या रसायनांना डिटॉक्सिफाय करते. बदललेल्या जीवनशैलीमुळे यकृताला नुकसान होते. यामुळे शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते. यासाठी आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच काही पदार्थ खाणे टाळले पाहिजे. यकृताचे कार्य सुरळीत राहण्यासाठी आणि यकृत उत्तम राहण्यासाठी काय करावे, याची माहिती आपण घेणार आहोत.

व्हिटॅमिन ए च्या जास्त सेवनाने यकृतात टॉक्सिन तयार होतात. एका दिवसात दहा हजार आयूपेक्षा जास्त व्हिटॅमिन ए घेतल्याने यकृताला धोका निर्माण होतो. शीतपेयांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. यातील सॅक्रिनसारखे आर्टिफिशियल स्वीटनर्स यकृताला हानीकारक आहेत. तसेच नैराश्यामध्ये घेतले जाणारे अँटिडिप्रेजंट औषधामुळे यकृताचे नुकसान होऊ शकते. जास्त वय असणाऱ्या लोकांना यकृत खराब होण्याचा धोका जास्त असतो. साखरेत फ्रक्टोज असते, जे चरबी वाढवण्याचे काम करते. जास्त फ्रक्टोजमुळे यकृताला नुकसान होते. यकृताला निरोगी ठेवण्यासाठी साखरेचा वापर कमीच करावा.

एमएसजी म्हणजेच मोनोसोडियम ग्लुटामेट हे जास्तीत जास्त चायनीज आणि पॅक्ड फूडमध्ये वापरले जाते. यामुळे यकृतावर सूज येते. तसेच कर्करोगसुद्धा होऊ शकतो. पॅरोसिटामॉलसारखे वेदनाशामक औषध अनावश्यक आणि जास्त घेतल्यानेसुद्धा यकृताला धोका निर्माण होतो. यासाठी विविध औषधे एकत्र घेण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. तसेच जास्त मीठ खाल्ल्याने यकृतामध्ये पाणी जमा होते आणि यामुळे यकृतावर सूज येण्याची समस्या होऊ शकते. वनस्पती तूप किंवा टान्स फॅट हायडोजनेटेड व्हेजिटेबल तेलाने तयार होतात. यामुळे वजन वाढवण्यासोबतच यकृतालाही धोका होऊ शकतो. जास्त मद्यपान करणे हे यकृत खराब होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. यामुळे यकृतावर सूज आणि यकृताचे सिरोसिस यांसारखे आजार होऊ शकतात. लठ्ठपणा वाढल्यामुळे यकृतातील पेशींमध्ये चरबी जमा होते. यामुळे यकृत सिरोसिससारख्या समस्या होऊ शकतात. जास्त लठ्ठ आणि मधुमेही लोकांना असे होण्याची शक्यता जास्त असते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु