लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय

लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बिघडलेली जीवनशैली आणि अयोग्य आहार, याचा परिणाम लहान मुलांच्या शारीरिक विकासावर वेगाने होत आहे. यामुळे लहान मुलींची उंची सुद्धा योग्य पद्धतीने वाढत नाही. वयाच्या मानाने मुला-मुलींची उंची कमी रहात असल्याचे आढळून येत आहे. उंची कमी असतानाच वजनही जास्त असण्याची मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. असे होण्यामागे अनेक कारणे आहेत. या समस्येवर उपाय करता येऊ शकतो. यासाठी काही वाईट सवयी दूर करून आणि काही नैसर्गिक उपाय केल्यास लहान मुलांची उंची वाढू शकते.

अनुवंशिक कारणामुळे उंची कमी असणे हे कारण असले तरी योग्य वेळेत उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केल्यास फायदा होतो. उंची वाढवण्यासाठी प्रथम लहान मुलांच्या आहारात भरपूर न्यूट्रीएंट्स असणे आवश्यक आहे. मुलांच्या डाएटमध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन,  कॅल्शिअम, झिंक, मॅग्नेशिअम आणि फॉस्फोरस असणे खूप आवश्यक आहे. त्यांना जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त आहार दिला पाहिजे. यासाठी चिकन, पनीर, सोयाबीन, फिश, अंडी यांचा आहारात समावेश करावा. तसेच हिरव्या भाज्या, सलाद आणि बीन्सचा सुद्धा समावेश करावा. दुधासोबतच त्यांना बदाम, शेंगदाणे, वेगवेगळी फळेही खाण्यास द्यावीत. लहान मुलांना फिजिकली अ‍ॅक्टिव ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यांना स्ट्रेचिंग करण्यास सांगावे आणि सायकलिंग सुद्धा करायला सांगावे. त्यासोबतच त्यांना अ‍ॅरोबिक्स, टेनिस, क्रिकेट, फुटबॉल आणि बास्केटबॉलसारखे खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. शिवाय, खांबाला लटकण्याची सवय लावल्यानेही त्यांची उंची वाढू शकते.

मुलांकडून नियमित सूर्यनमस्कार करून घेतले पाहिजेत. योगाभ्यास केल्याने त्यांचे मसल्स फ्लेक्झिबल होतील आणि स्ट्रेचिंगमुळे उंची वाढण्याचीही शक्यता अधिक असते. तसेच उंची वाढवण्यास त्रिकोणासन, भुजंगासन, सुखासन, वृक्षासन, नटराजासन ही आसने खूपच लाभदायक आहेत.लहान मुलांचे पोषण योग्य असणे फार गरजेचे असून अनेकदा पोषण चुकीचा असल्याने हाडेही प्रभावित होतात. त्यामुळे त्यांचा उठण्या-बसण्याची आणि उभे राहण्याची पद्धत यावर लक्ष द्यावे. जेणेकरून त्यांचे पोषण योग्य होईल आणि उंची कमी होणार नाही. लहान मुलांना लागलेली मोबाइल आणि टीव्हीची सवय कमी केली पाहिजे. या सवयीमुळे लहान मुले झोपेकडे दुर्लक्ष करून मोबाइल बघत बसतात. त्यामुळे त्यांच्यात हार्मोनचे बॅलन्स बिघडते. अनेकदा तर पिट्यूरिटी ग्लँड सुद्धा या हार्मोन्समुळे प्रभावित होते. ही काळजी घेतल्यास मुलांची उंची वाढण्यास मदत होईल. शिवाय, त्यांचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होईल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु